Honda Activa Electric Kit: पेट्रोल आणि डीझेलचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या ई-स्कूटर आणि ई-कार्सची मागणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहून वाहन उत्पादक कापण्या देखील ई-स्कूटर मार्केटमध्ये आणत आहेत. तर काही कंपन्या आपले जुने मोडेल्स इलेक्ट्रिक अवतारात रूपांतरित करून पुन्हा लाँच करत आहेत. नुकतेच Splendor आणि HF Deluxe च्या इलेक्ट्रिक व्हर्जन पाहायला मिळाले आहेत. तर आता होंडा Activa चे देखील इलेक्ट्रिक व्हर्जन पाहायला मिळत आहे.
Honda Activa Electric Kit: नुकतेच एका खासगी कापणीने होंडा Activa साठी इलेक्ट्रिक किट तयार केले आहे. तुम्ही हे किट वापरून आपल्या जुन्या होंडा Activa ला इलेक्ट्रिक अवतार देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 18330 रुपये खर्च करावे लागतील. GoGoA1 ही कंपनी जी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट देखील बनवते.
कंपनीने Hero Splendor साठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार केल्यानंतर आता कंपनीने Honda Activa साठी देखील इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार केले आहे. इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर तुम्हाला ३ वर्षांपर्यंत एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. म्हणजे 3 वर्षे टेन्शन नाही. हिरो स्प्लेंडरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला देखील खूप पसंती दिली जात आहे. आता Honda Activa चा इलेक्ट्रिक अवतार लोकांना आवडेल अदा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Honda Activa Electric Kit प्राईस
GoGoA1 कंपनीने उत्पादित केलेले हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तुमच्या स्कूटरला हायब्रीड आणि कंप्लीट इलेक्ट्रिक मध्ये बदलू शकते. होंडा Activa हायब्रीड इलेक्ट्रिक किटची किंमत 18330 रुपये आहे जे जीएसटी नंतर तुम्हाला 23000 रुपयांपर्यंत मिळेल.
इलेक्ट्रिक होंडा Actica रेंज
कंपनीने या इलेक्ट्रिक किट मध्ये 60 व्होल्ट आणि 1200 वॅटची पॉवर दिली आहे. शिवाय यामध्ये बीएलडीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. तर हि मोटर जुन्या Activa मध्येच वापरता येणार आहे. इलेक्ट्रिक किटमध्ये तुम्हाला 72 व्होल्ट 30 Ah चा बॅटरी पॅक दिला जाईल.