Ira Khan Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लाडकी लेक इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी 3 जानेवारी रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर दोघे (10 जानेवारी रोजी) उदयपुर मध्ये नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न (Ira Khan Nupur Shikhare Wedding) केल्याचे व्हिडीओ वरून दिसत आहे.
लग्नाचा व्हिडीओ व्हायरल – Ira Khan Nupur Shikhare Wedding
लग्नामध्ये इराने व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता तर नुपूरने ग्रे कलरचा सूट घातला होता. दोघे या लुकमध्ये खूपच सुदंर दिसत होते. दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालून एंट्री घेतल. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
इरा खान आणि नुपूर शिखरेच्या लग्नाचा व्हिडीओ इंस्टंट बॉलीवूड या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. व्हिडीओ अल्पावधीमध्येच सोशल मिडियावर व्हायरल झाला. ज्यानंतर चाहते आणि सेलेब्रिटी त्यांच्या व्हिडीओवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. इरा खान आणि नुपूर शिखरेचा आंतरधर्मीय विवाह आहे.
मुंबईमध्ये 3 जानेवारी रोजी झालेल्या सोहळ्यामध्ये नुपूर शिखरे याने घरातून फंक्शनच्या ठिकाणी धाव घेत उपस्थिती दिली होती. त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तो शॉर्ट्स व बनियनमध्ये पोहोचला होता, ज्यानंतर दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले.
हेही वाचा: ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री सुरभि चंदना अडकणार विवाह बंधनात, बॉयफ्रेंडसोबत घेणार सात फेरे