iVOOMi Electric Scooter Discount: या महिन्यामध्ये ओला इलेक्ट्रिकने आपल्या ई-स्कूटरवर व्हॅलेंटाईन डे ऑफर सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना ई-स्कूटरवर 25,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. अशामध्ये आता आईवूमी (iVOOMi Electric Scooter) ने आपल्या सर्व मॉडेल्सवर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. आता Jeet X, S1 आणि S1 2.0 सारख्या मॉडेल्सच्या किमतीत खूपच घसरण झाली आहे. आईवूमी JeetX मॉडल वर 10,000 रुपयांचा डिस्काउंट डेट आहे तर S1 आणि S1 2.0 वर 5000 पर्यंतचा डिस्काउंट देत आहे. ग्राहकांना या ऑफरचा फायदा 31 मार्च 2024 पर्यंत मिळणार आहे.
iVOOMi इलेक्ट्रिक स्कूटरच्या नवीन किंमती
जीत X आईवूमी ची प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. हि स्टायलिश डिझाईनसोबत येते. तर उत्तम रायडींग एक्सपीरियंससाठी कम्फर्टेबल सीट मिळते. याची टॉप स्पीड 65 किमी प्रति तास आहे. तर सिंगल चार्जवर हि 100 किलोमीटरची रेंज देते. हि स्कूटर तुम्ही 5 स्टायलिश कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. कपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 10000 रुपयांची सूट देत आहे. ज्यानंतर याची किंमत 89,999 रुपये झाली आहे.
आईवूमी ची एंट्री लेवल इलेक्ट्रिक स्कूटर S1 आहे. या उत्तम डिझाईन आणि चांगल्या परफॉर्मेंस साठी ओळखले जाते. हि ई-स्कुट सिंगल चार्जमध्ये 120 किलोमीटरची रेंज देते. याची टॉप स्पीड 57 किलोमीटर प्रति तास आहे. याला खासकरून अर्बन कम्यूटिंग साठी सादर करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर वर 5000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ज्यानंतर याची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये झाली आहे.
iVOOMi च्या दुसऱ्या बजट इलेक्ट्रिक स्कूटर S1 2.0 बद्दल बोलायचे झाली तर कंपनी यावर देखील 5000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. अशामध्ये याची एक्स-शोरूम किंमत 82,999 रुपये झाली आहे. हि स्कूटर 6 कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. सिंगल चार्जमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 110 किलोमीटर पर्यंत आहे. तर याची टॉप स्पीड 57 किलोमीटर प्रति तास आहे. हि स्कूटर अर्बन कम्यूटर म्हणून वापरली जाते.