प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकर अडकले विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

Prathamesh Parab Wedding: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रथमेश त्याच्या लग्नामुळे चर्चेमध्ये होता. अभिनेता आज 24 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेशचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर चाहत्यांना त्याच्या लग्नाची आतुरता लागली होती. अखेर तो विवाहबंधनात अडकलं आहे. त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत त्याने लग्नगाठ बांधून एका नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

Prathamesh Parab Wedding

प्रथमेशने शेयर केले फोटो

अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या लग्नाचे काही फोटो (Prathamesh Parab Wedding) सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटो शेयर करत त्याने, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. कपलने लग्नासाठी पारंपारिक लुक केला होता.

क्षिताजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर तिने गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तर प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सादर घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती तर डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. प्रथमेशने शेयर केलेय फोटोवर चाहते आणि अनेक कलाकार मंडळी कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इंस्टाग्राम या सोशल मिडियावर झाली होती. गप्पा मारता-मारता दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. टाईमपास 3 च्या शुटींगदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते.

कोण आहे प्रथमेशची बायको

प्रथमेशची बायको क्षितिजा घोसाळकर हि एक फॅशन मॉडेल आहे. त्याचबरोबर ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवडत आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात जास्त रुची आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको पहिल्यांदा पाहायला मिळाली होती.

News Title: prathamesh parab wedding photos