रकुल प्रीतच्या ब्राइडल एंट्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, ब्राइडल एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल

Rakul Preet Singh Bridal Entry: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. नुकतेच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये रकुल एखाद्या परीसारखी एंट्री करताना पाहायला मिळत आहे. पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. पहा व्हिडीओ

Rakul Preet Singh Bridal Entry

रकुल प्रीत सिंहची ब्राइडल एंट्री (Rakul Preet Singh Bridal Entry)

रकुल प्रीत सिंहच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते भारावून गेले आहेत. व्हिडीओमध्ये गोव्याचे सुंदरी दृश्य, अभिनेत्रीच्या दोन्ही बाजूला फुले आणि आजूबाजूला उपस्थित असलेले पाहुणे पाहायला मिळत आहेत. जॅकीला पाहून रकुल आनंदाने नाचताना दिसत आहे. रकुलचा आउटफिट आणि वेडिंग लोकेशन एकदम परफेक्ट दिसत आहे.

राजा-राणीसारखे दिसले राकुल-जॅकी (Rakul-Jackky Wedding Video)

ब्राइडल एंट्री सोबत लग्नाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांसोबत मंडपामध्ये पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला सर्व उपस्थित असलेले पाहुणे या कपलला पाहून खूपच आनंदी दिसत आहेत.

चाहत्यांना आवडला कपलचा लुक

चाहत्यांना रकुल आणि जॅकीचा वेडिंग लूक खूप आवडला आहे. दोघांनी पेस्टल रंगाच्या वेडिंग आउटफिट्समध्ये लग्न केले. या कपलच्या लग्नाचे फोटो समोर आल्यापासून ते सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे.

News Title: rakul preet singh bridal entry video