विराट कोहली नंतर आता केन विलियमसन बनला बाबा, खेळाडूच्या घरी चिमुकलीचे आगमन

Kane Williamson Become a Father of Baby Girl: न्यूझीलंड संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी सारा रहीमने गोड मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती केन विलियमसनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून दिली आहे. केन विलयमसनला दोन मुलांचा वडील होता, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होती. आता त्याच्या घरी आणखी एक मुलगी आली आहे. तो आता तीन मुलांचा बाबा झाला आहे.

Kane Williamson Become a Father of Baby Girl

पोस्ट शेयर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज

विलियमसन ने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीसोबत आणि पत्नीसोबत एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. फोटोला कॅप्शन देत त्याने आणि आता 3 झाले असे लिहिले आहे. या सुंदर मुलीचे जगामध्ये स्वागत आहे. तुमच्या सुरक्षित आगमनासाठी आणि पुढील रोमांचक प्रवासासाठी खूप आभारी आहे. केन विलियमसन आणि सारा रहीम यांनी लग्न केलेले नाही. पण दोघे जवळ जवळ 9 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत. तथापि दोघांना आता तीन मुले झाली आहेत. पण अजून त्यांनी लग्न केलेले नाही.

हेच कारण होते कि केन विलियमसन ऑस्ट्रेलिया विरुध्द तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये सहभागी झाला नव्हता. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळला होता पण यानंतर तो पॅटरनिटी लीववर गेला होता. तथापि तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध गुरुवारी 29 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट साम्याम्ध्ये खेळताना दिसू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत केन विल्यमसनने दमदार फलंदाजी करत दोन शतके झळकावली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका

अशामध्ये कीवी टीमचा नवीन कर्णधार टीम साऊदी याला आशा असेल की विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही धावा करेल. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे, कारण ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जाणार आहे. न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड संघ हा सामना हरला तर भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचेल.

News Title: kane williamson become a father of baby girl

हेही वाचा: अनुष्का-विराटने दुसऱ्या मुलाचे ठेवले युनिक नाव, जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ