सिद्धू मूसेवालाची आई आहे प्रेग्नंट, मार्चमध्ये कुटुंबांत येणार छोटा पाहुणा

Sidhu Moosewala Mother Pregnant: सिंगर शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आता दोन वर्षानंतर सिंगरच्या कुटुंबाबद्दल एक मोठा दावा केला जात आहे. रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे कि सिंगरची आई प्रेग्नंट आहे. कुटुंबामध्ये छोटा पाहुणा येणार आहे.

मे 2022 मध्ये शूटर्सनी सिद्धू मूसवालाच्या थार कारवर 30 पेक्षा जास्त राउंड फायर केले होते. या अपघातात त्यांना 19 हून अधिक गोळ्या लागल्या आहेत. ‘ट्रिब्यून इंडिया’ च्या रिपोर्टनुसार सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर प्रेग्नंट (Sidhu Moosewala Mother Pregnant) आहे. मार्चमध्ये त्यांची डिलिव्हरी देखील होणार आहे.

रिपोर्टमध्ये सिंगरचे अंकल चमकौर सिंह यांनी हि माहिती दिली आहे. हे देखील सांगितले कि IVF द्वारे चरण कौर मां आई होणार हेत. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अद्याप गायकांच्या पॅरेंट्सनी या प्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

कोण आहे सिद्धू मूसेवालाची आई

सिद्धू मूसेवालाची आई चरणजीत कौर या देखील राजकारणाशी संबंधित आहेत. त्या मूसा गावाच्या (मानसा जिल्हा) सरपंच देखील राहिल्या आहेत. त्या काँग्रेस पक्षाच्या समर्थक होत्या. सिद्धू यांनी स्वतः मानसा मधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा आपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.

Sidhu Moosewala Mother Pregnant

तर दुसरीकडे मूसवाला यांचे वडील बलकौर सिंह निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. ते बंथिडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांनी अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. सिद्धू मूसवाला यांची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती, त्यावेळी ते 28 वर्षांचे होते. चाहत्यांमध्ये या गायकाची क्रेझ जबरदस्त होती. सिद्धू मूसवाला यांच्या हत्येबद्दल अनेक सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला होता.

News Title: sidhu moosewala mother pregnant