Anushka Virat Kohli Son Name: अनुष्का-विराटने दुसऱ्या मुलाचे ठेवले युनिक नाव, जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ

Anushka Sharma Virat Kohli Son Name Meaning: बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी तिच्या मुलाला जन्म दिला. हि गुड न्यूज कपलने 20 फेब्रुवारी रोजी सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दिली. हि गोड बातमी शेयर करत अनुष्का-विराटने आपल्या मुलाचे नाव (Anushka Virat Kohli Son) देखील रीवील केले. जे खूपच युनिक आहे. चला तर जाणून घेऊया या नावाचा अर्थ.

Anushka Virat Kohli Son

मुलाचे आई-बाबा बनले विराट-अनुष्का

अनुष्का-विराटने हि गोड बातमी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केली आहे. पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि, आम्हाला तुम्हा सर्वांना हे सांगताना खूप आनंद होत आहे कि 15 फेब्रुवारी रोजी आमचा मुलगा (Anushka Virat Kohli Son) आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय चे या जगामध्ये स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणी आम्हाला फक्त तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाहिजे आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया यावेळी आमच्या प्राइवेसीचा आदर करा. प्रेम आणि आभार.

अनुष्का-विराटने मुलांचे नाव आकाय ठेवले

या पोस्टनंतर आता प्रत्येकजण कपलला शुभेच्छा देत आहे आणि मुलाचे देखील कौतुक करत आहे. अनुष्का-विराटने मुलाच्या नाव खूपच युनिक ठेवले आहे. कपलने लाडक्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. ज्याचा अर्थ ज्याचा कोणताही आकार नाही असा होतो. माहितीनुसार अकाय हा एक हिंदी शब्द आहे, ज्याचा मूळ तुर्कीश आहे. संस्कृतमध्ये अकाय चा अर्थ म्हणजे अशी गोष्ट जिला आकार नाही असा होतो. म्हणजेच हा शब्द काया पासून बनला आहे ज्याचा अर्थ शरीर आहे.

पहिला वामिकाचे बनले होते आई-बाबा

आकायच्या अगोदर अनुष्का-विराट मुलगी वामिकाचे आई-बाबा बनले होते. अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी तिच्या मुलीला जन्म दिला होता. जी आता चार वर्षाची झाली आहे. तथापि कपलने अजूनपर्यंत वामिकाचे चेहरा रीवील केलेला नाही. पण एकदा वामिका तिच्या आईसोबत स्टेडियममध्ये पाहायला मिळाली होती. तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते.

वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का शर्मा जीरो चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये ती शाहरुख खानसोबत दिली होती. आता अभिनेत्री चकदा एक्सप्रेस चित्रपटामध्ये दिसणार आहे ज्याचे शुटींग पूर्ण झाले आहे. हा एक बायोपिक आहे. अभिनेत्रीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

News Title: anushka sharma virat kohli son name meaning