छोटा जसप्रीत बुमराह! लहान मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची हुबेहूब कॉपी, व्हिडीओ व्हायरल

Jasprit Bumrah Bowling Action

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह केल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाचा खूपच महत्वाचा गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज त्याला आपली प्रेरणा मानतात. फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामधील अनेक देशांमध्ये त्याचे चाहते झाले आहेत जे त्याला आदर्श मानतात. जसप्रीत बुमराह बॉलिंग अ‍ॅक्शन देखील खूप हटके आहे. अशामध्ये अनेकजण त्याची अ‍ॅक्शन कॉपी करताना पाहायला मिळतात.

लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल

नुकतेच असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक छोटा मुलगा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ची अ‍ॅक्शन अगदी हुबेहूब कॉपी करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील एका मुलाचा असल्याचे म्हंटले जाते आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि त्या मुलाने बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची अगदी हुबेहूब कॉपी केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमधील त्या लहान मुलाची अ‍ॅक्शन पाहून लोक त्याला पाकिस्तानचा बूमराह असे देखील म्हणत आहेत. तर काहींनी त्याला छोटा बूमराह देखील म्हंटले आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका

भारताच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या बूमराह (Jasprit Bumrah) आईसीसी च्या सर्व फॉर्ममॅटमध्ये पहिली रँकिंग मिळवणारा एकमेव गोलंदाज बनला आहे. सध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेमध्ये बूमराहने जबरदस्त प्रदर्शन केले होते. बूमराहने 33 ओवरमध्ये 9 विकेट घेतल्या होत्या. या मालिकेमध्ये भारताने दुसरा सामना जिंकून बरोबरी साधली आहे. इंग्लडने पहिला कसोटी सामना जिंकला होता.

भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरी कसोटी 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. हा सामना मालिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो आणि त्यामुळे या सामन्यात बूमराहची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. अशामध्ये बूमराह या साम्यान्यामध्ये कसे प्रदर्शन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

News Title: kid performs bowling action of jasprit bumrah

हेही वाचा: टी20 विश्व कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार हे 15 खेळाडू, हार्दिक पांड्या कर्णधार तर कोहली-रोहितला डच्चू?