Navin Marathi Ukhane For Female 2024 लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. या क्षणी ही म्हण आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीही विसरणार नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एकापेक्षा एक अप्रतिम उखाणे घेऊन येत आहोत. तर कृपया हा ब्लॉग वाचा “स्त्रियांसाठी मराठी उखाणे” पतीसाठी उखाणे. योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी नशीब लागते. कारण लग्नात जे मिळते ते दोन शरीरच नाही तर दोन ह्रदयेही असतात. आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यायोगे त्या सोबतीला तुमच्या प्रेमात पडावे. Marathi Ukhane For Female चला तर मग सुरुवात करूया.
Marathi Ukhane For Female वधूसाठी मराठी उखाणे
- कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,(..पतीचे नाव..) चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
- देवाला जे मागितले ते सर्व मिळाले, खूप खुश आहे आज मी, कारण (..पतीचे नाव..) सोबत माझे लग्न जुळाले.
- वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,(..पतीचे नाव..) चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
- बारीक मणी घरभर पसरले,(..पतीचे नाव..) साठी माहेर विसरले.
- पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,(..पतीचे नाव..) रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
- लग्नात लागतात हार आणि तुरे,(..पतीचे नाव..) च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
- चंदनी पानात मुग्ध कळी हसली,(..पतीचे नाव..) रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
- रुपेरी सागरावर चंदेरी लाट,(..पतीचे नाव..) रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
- परसात अंगण, अंगणात तुळस,(..पतीचे नाव..) नाव घ्यायचा मला नाही आळस.
- रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,(..पतीचे नाव..) च्या साथीने आदर्श संसार करीन.
- हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,(..पतीचे नाव..) मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
- इंग्रजीत म्हणतात मून,(..पतीचे नाव..) चंनाव घेते ….ची सून.
- सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
- आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,(..पतीचे नाव..) चं नाव घेते कुंकू लावून.
- चांदीच्या ताटात गाजराचा हलवा,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
- चांदीचे जोडवे पतीची खूण,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते ….ची सून.
- आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,(..पतीचे नाव..) चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
- आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,(..पतीचे नाव..) याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
- बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध,(..पतीचे नाव..) रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
- वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
- अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,(..पतीचे नाव..) रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
विनोदी उखाणे Marathi Ukhane For Female
- श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून,(..पतीचे नाव..) च्या नावाने आले सुख माझे फुलून.
- पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल ,(..पतीचे नाव..) रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
- पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला (..पतीचे नाव..) रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.
- एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,(..पतीचे नाव..) रावांची सारी माणसे मी आपली मानली.
- घराला असा व अंगण अंगणात डोलावी तुळस,(..पतीचे नाव..) रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस.
- मंगळसूत्र आहे सासरची प्रीती (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.
- सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.
- आकाशाच्या स्वर्गात ब्रह्मा विष्णू आणि महेश (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेऊन करते हो घरात प्रवेश.
- चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा, (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा.
- माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी, (..पतीचे नाव..) रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी.
- आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
- साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,(..पतीचे नाव..) राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
- हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि (..पतीचे नाव..) किती टिंगू.
- केळीचं पान टरटर फाटतं, (..पतीचे नाव..) ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
- त्यांचा नि माझा संसार होईल सुकर, जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
- समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,(..पतीचे नाव..) राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
- पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,(..पतीचे नाव..) आहेत आमचे फार नाजूक.
- भल्या पहाटे करावी देवाची पूजा, (..पतीचे नाव..) रावांच्या जीवावर करते मी मजा.
- बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड, (..पतीचे नाव..) रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.
- मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,(..पतीचे नाव..) भाव देत नाही किती केले ट्राय.
- खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, (..पतीचे नाव..) ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.
- मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून, (..पतीचे नाव..) रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून. Marathi Ukhane For Female
- साखरेचे पोते सुईने उसवले, (..पतीचे नाव..) ने मला पावडर लावून फसविले.
- ही पण आहे सुंदर ती पण आहे छान, कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.
- लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते, तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
- कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी, (..पतीचे नाव..) याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.
- काल होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी, (..पतीचे नाव..) यांनी दिलं मला लिंबूपाणी, कारण नवरा माझा स्मार्टी.
- Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka, (..पतीचे नाव..) याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.
- घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका, (..पतीचे नाव..) आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
Marathi Ukhane For Marriage लग्नाचे उखाणे
- रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा (..पतीचे नाव..) रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.
- वडिलांचा आशीर्वाद मातेची माया (..पतीचे नाव..) रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया.
- डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल (..पतीचे नाव..) रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
- ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात, (..पतीचे नाव..) राव आणि माझी जोडी ठेव सुखात.
- अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, (..पतीचे नाव..) रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.
- दया-क्षमा-शांती हेच तिचे माहेर (..पतीचे नाव..) रावांच्या चरणावर केला पंचप्राणांच्या आहेर.
- सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा-विष्णू-महेश, (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश.
- शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल (नाव पतीचे) रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
- हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी, (..पतीचे नाव..) च्या जीवनात आहे मला गोडी.
- आंबा गोडच गोड त्याहीपेक्षा (..पतीचे नाव..) चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
- मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,(..पतीचे नाव..) यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
- सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण, (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
- नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, (..पतीचे नाव..) रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
- कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट (..पतीचे नाव..) नाव घेते बांधते….च्या लग्नाची गाठ.
- वाट जीवनाची झाली सुखद आनंदी, (..पतीचे नाव..) च्या सवे चालते मी सप्तपदी…!!
- चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, (..पतीचे नाव..) रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची. Marathi Ukhane For Female
- लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, (..पतीचे नाव..) चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
- सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात, सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात (..पतीचे नाव..) रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
- पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,(..पतीचे नाव..) रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
- गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, (..पतीचे नाव..) रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
- घातली मी वरमाला हसले (..पतीचे नाव..) राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
- वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, (..पतीचे नाव..) रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
- मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, (..पतीचे नाव..) बरोबर संसार करीन सुखाचा.
- चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, (..पतीचे नाव..) चं नाव घेते देवापुढे.
- गावठी गुलाबाला सुगंध सुवास, (..पतीचे नाव..) रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
- हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, (..पतीचे नाव..) रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
- हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, (..पतीचे नाव..) रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
- शेल्या शेल्याची बांधली गाठ, (..पतीचे नाव..) नाव मला तोंडपाठ.
- नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते (..पतीचे नाव..)च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
Marathi Ukhane For Female रोमँटिक मराठी उखाणे
- पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते (..पतीचे नाव..) रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
- कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर (..पतीचे नाव..) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
- संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, (नाव पतीचे) रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती
- बशीत बशी कप बशी, (..पतीचे नाव..) ला सोडून बाकी सगळ्या म्हशी.
- रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास, (..पतीचे नाव..) रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास.
- सागराच्या हृदयी अंतरंग लपले (..पतीचे नाव..) रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले.
- गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, (..पतीचे नाव..) रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती.
- मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून (नाव पतीचे) रावांचं नाव घेते (नाव पत्नीचे)च्या कुटुंबाची सून
- इंग्रजी भाषेला महत्त्व आले फार, (..पतीचे नाव..) ने फुलवला माझा संसार.
- आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास, (..पतीचे नाव..) रावांना भरविते जिलेबिचा घास.
- धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले (..पतीचे नाव..) राव अशीच असते प्रीती.
- एका वर्षात असतात महिने बारा,(..पतीचे नाव..) च्या नावात समावलाय आनंद सारा.
- यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू (..पतीचे नाव..) आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.
- तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, (..पतीचे नाव..) पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट. Marathi Ukhane For Female
- सूर हवा तर ताल हवा, ताल हवा तर सूर हवा (..पतीचे नाव..) रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा?
- मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, (..पतीचे नाव..) च्या स्पर्शाने उमटले झंकार..!
- पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, (..पतीचे नाव..) रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
- झाली प्रभात..विहंग उडाले गात, (..पतीचे नाव..) रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!
Satyanarayan Pooja Ukhane In Marathi सत्यनारायण पूजा
- पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी.
- सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट (..पतीचे नाव..) यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट.
- मंथरेमुळे घडले रामायण,(..पतीचे नाव..) चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण.
- ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी (..पतीचे नाव..) चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी.
- चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती (..पतीचे नाव..) रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
- आजच्या पूजेला फुलांच्या राशी, (..पतीचे नाव..) च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
- भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा (..पतीचे नाव..) च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा.
- दारावर लावले झेंडूचे तोरण (..पतीचे नाव..) चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण.
- चांदीच्या ताटात ठेवले लाडू (..पतीचे नाव..) चे नाव घेते सत्यनारायणापुढे.
- घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी (..पतीचे नाव..) चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
- आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,(..पतीचे नाव..) चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
- जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण (..पतीचे नाव..) नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.
- ….सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन. (..पतीचे नाव..) माझा हीरो मी त्याची हिरॉईन
50+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी Happy Birthday Wishes