Mohammed Shami Shares his niece’s fourth birthday photos: भारताचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्डकपमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. त्याने वर्ल्डकप मध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान मोहम्मद शमी आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. नुकतेच त्याने आपल्या भाचीचा चौथा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला ज्याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेयर केले.
Mohammed Shami ने शेयर केले भाचीच्या वाढदिवसाचे फोटो
भारताचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या भाचीच्या वाढदिवसाचे फोटो शेयर केले आहेत. फोटो शेयर करताच अल्पावधीमध्ये ते सोशल मिडियावर व्हायरल झाले. दरम्यान मोहम्मद शमीची भाची यादरम्यान खूपच क्युट दिसत होती. शमीने फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये ‘आम्ही आमच्या छोट्या राजकुमारीचा वाढदिवस उत्साहाने साजरा करतानाच्या गोड आठवणी. कुटुंबासोबतचा वेळ सर्वात मौल्यवान वेळ असे लिहिले आहे.
चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
मोहम्मद शमीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून फोटो शेयर करताच ते सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. चाहते फोटोवर कमेंट करून चिमुकलीला शुभेच्छा देत आहेत. काहींनी प्रिन्सेस खूपच क्युट दिसत आहे अशी कमेंट करून चिमुकलीचे कौतुक केले आहे.
मोहम्मद शमी बद्दल बोलायचे झाले तर वर्ल्डकप नंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जास्त असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये शमी पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आता अशी बातमी समोर आली आहे कि शमी नावावर या सिरीजसाठी विचार केला गेला नाही.
हेही वाचा: ‘सचिन जेव्हा ‘तेंडुलकर’ला भेटतो तेव्हा…! स्वतः मास्टर ब्लास्टरनंच शेयर केला व्हिडीओ