महादेवाच्या भक्तीत लीन झाली मौनी रॉय, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल, पहा फोटोज

Mouni Roy at Adiyogi Shiv Mandir: टीव्हीवरील प्रसिद्ध नागीण मौनी रॉय (Mouni Roy) आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ अनेकवेळा चाहत्यांसोबत शेयर करत असते. मौनी रॉय सोशल मिडियावर नेहमी सक्रीय असते. नेहमी फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत, जे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. मौनी रॉयने सोशल मिडिया अकाऊंटवरून जे फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये ती आदियोगी महादेवाचे दर्शन करताना पाहायला मिळत आहे. 38 वर्षाच्या अभिनेत्रीने टीव्हीवरच नाही तर मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Mouni Roy

Mouni Roy ने आदियोगी महादेवाचे केले दर्शन

मौनी रॉयने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय (Mouni Roy) कोईम्बतूर येथील आदियोगी शिव प्रतिमाचे दर्शन करताना पाहायला मिळत आहे. टीव्ही वरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सामील असलेल्या मौनीला या फोटोंमध्ये शिव भक्तीमध्ये लीन झालेली पाहू शकता. एका फोटोमध्ये अभिनेत्री महादेवाचा जल अभिषेक करताना पाहायला मिळत आहे.

इथे पहा फोटो

आदियोगी महादेवाचा केला जल अभिषेक

आदियोगी महादेवाच्या समोर पोज देतानाचे देखील फोटो शेयर केले आहेत. मौनीचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान अभिनेत्री पिंक कलरच्या सूटमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तूच आदि आहेस, तूच अनंत आहेस, शिव शिव! मौनी रॉय (Mouni Roy) ने भोले बाबाच्या दरबारातील अनेक फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये ती शिव भक्तीमध्ये तल्लीन होऊन कधी पूजा तर कधी पाण्याचा अभिषेक करताना दिसत आहे.

मौनी रॉय वर्कफ्रंट

मौनी रॉय (Mouni Roy) शेवटची अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. मौनी रॉय लवकरच द वर्जिन ट्री मध्ये सनी सिंह आणि पलक तिवारीसोबत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेव करणार आहे तर संजय दत्तची निर्मिती आहे. 2022 मध्ये मौनी रॉयने सूरज नांबियार सोबत लग्न केले होते.

हेही वाचा: कामाख्या देवीला भूमी पेडणेकरने मागितला नवस, बहिणीसोबत भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसली अभिनेत्री