‘सचिन जेव्हा ‘तेंडुलकर’ला भेटतो तेव्हा…! स्वतः मास्टर ब्लास्टरनंच शेयर केला व्हिडीओ

Sachin Tendulkar Viral Video: तुम्ही रस्त्यामधून जाताना अचानक एक गाडी तुमच्या बाजूला उभी राहते आणि स्वतः सचिन तेंडूलकर तुम्हाला रस्ता विचारतो तेव्हा समोर साक्षात क्रिकेटच्या देवाला समोर पाहून जशी तुम्ही अवस्था होईल तशीच अवस्था सध्या एका चाहत्याची झाली आहे. हा व्हिडीओ स्वतः सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. हा व्हिडीओ (Sachin Tendulkar Viral Video) कुठला आहे याबद्दल सचिनने सांगितलेले नाही पण चाहत्यांच्या प्रेमामुळेच आपलं आयुष्य इतकं स्पेशल झालंय असं सचिननं पोस्टमध्ये आवर्जून म्हंटल आहे.

Sachin Tendulkar Viral Video

सचिनने शेयर केला व्हिडीओ – Sachin Tendulkar Viral Video

सचिन तेंडुलकरने त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ (Sachin Tendulkar Viral Video) शेयर केला आहे. ज्यामध्ये तो रस्त्यावरून जाताना स्कुटीवरून जाणाऱ्या एका चाहत्यांला बोलताना पाहायला मिळत आहे. या चाहत्याचं नाव हरीश कुमार असून सचिन तेंडूलकरनं त्याच्या फोटोसंग्रहावर सही देखील दिली आहे. तेंडुलकर 10 आय मिस यु असं लिहिलेला टी-शर्ट चाहत्यांने घातला होता. शिवाय हेल्मेट घालून गाडी चालवत असल्यामुळे सचिनने त्याचे कौतुक देखील केले.

दरम्यान हरीशला देखील व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे कि, ‘माझा विश्वास बसत नाहीय कि माझ्यासोबत स्वतः सचिन तेंडुलकर आहे आणि मी त्याच्यासोबत बोलत आहे. आज मला देवाचं दर्शन झालं. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे.

सचिन तेंडूलकर जरी क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला तर त्याच्या चाहत्यांमध्ये जरा देखील कमी झालेली नाही. चाहते अजूनदेखील त्याच्यावर तितकेच प्रेम करतात. आजपर्यंत सचिनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सचिनने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, सचिन ‘तेंडुलकर’ तेंडुलकरला भेटला, जेव्हा मी चाहत्यांचा माझ्यावर इतकं प्रेम पाहतो तेव्हा माझं मन आनंदानं भरून येतं. अतिशय अनपेक्षितपणे अशा प्रकारे चाहत्यांचं प्रेम व्यक्त होतं. यामुळेच माझं आयुष्य फार स्पेशल होऊन जातं”,

हेही वाचा: सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत, कॅमेरा समोर दिसताच सचिनच्या लेकीनं लपवला चेहरा, व्हिडीओ व्हायरल