अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेयर केला ‘तो’ भयानक अनुभव, म्हणाली; “माझ्या मांड्या जाड…”

Mrunal Thakur: ‘सिता रामम’, ‘हाय नन्ना’ सारख्या चित्रपटामधून घराघरामध्ये फेमस झालेली अभिनेत्री मृणाल ठाकूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. साऊथ तसेच बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. खूपच कमी काळामध्ये प्रसिद्ध मिळवलेली अभिनेत्री मृणाल सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय असते. नुकतेच अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) तिच्या एका विचित्र अनुभवनाबद्दल खुलासा केला आहे.

Mrunal Thakur

मृणाल ठाकूरने शेयर केला अनुभव

मृणाल ठाकूर हि से क्सी दिसत नाही म्हणून एका दिग्दर्शकाने तिला रिजेक्ट केलं होतं असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. यानंतर अभिनेत्रीने दिग्दर्शकाला लुक टेस्ट घेण्याची रिक्वेस्ट केली. त्यानंतर दिग्दर्शकाने मृणालची माफी मागितली. याअगोदर देखील तिला अशा परिस्थितीचा अनेकवेळा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर तिला वजन कमी करण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता.

मृणालला एका गाण्यावर काम करायचे होते. त्यावेळी तिला अनेकजणांनी या गाण्यावर काम न करण्याचा सल्ला दिला. मृणाल खूप जाड आहे आणि त्यामुळे या गाण्यामध्ये काम करायचे असेल तर तिला तिच्या मांड्यांवरील अतिरिक्त मांस कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना मृणाल म्हणाली कि, मी एक गाणं केलं तेव्हा मला बऱ्याच लोकांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला कारण माझ्या मांड्या फार जाड होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हणाल्या, माझ्या मांड्या जाड आहेत यात काहीच गैर नाहीये. जर मला त्या गोष्टीची अजिबात अडचण होत नाही, तर तुम्ही एवढी चिंता का करता?”

वर्कफ्रंट

2014 मध्ये आलेल्या विटी दांडू या मराठी चित्रपटामधून मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तर ऋतिक रोशनच्या सुपर 30 चित्रपटामध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यनंतर तिने तुफान, जर्सी, सेल्फी, गुमराह लस्ट स्टोरीज 2 सारख्या चित्रपटांमध्ये कम केले. 2022 मध्ये आलेल्या सीता रामम चित्रपटामधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. आता मृणाल प्रभासच्या कल्कि 2989 AD चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे.

News Title: mrunal thakur shared strange experience

हेही वाचा: “तुमच्याबरोबर झोपले तर…”, श्रृती मराठेने शेयर केला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव; म्हणाली, “ती व्यक्ती मला…”