Nayanthara Net Worth: 100 करोडच्या घरापासून ते प्राईवेट जेटपर्यंत ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे नयनतारा

Nayanthara Net Worth: शाहरुख खानच्या जवान चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री नयनतारा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नयनतारा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत. नयनतारा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नाही तर नयनताराचे नाव फोर्ब्स मॅगझिन च्या सेलेब्रिटी लिस्टमध्ये देखील सामील झाले आहे.

नयनतारा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील पहिली अभिनेत्री आहे जिचे नाव फोर्ब्स मॅगझिन च्या सेलेब्रिटी लिस्टमध्ये सामील झाले आहे. अभिनेत्री आलिशान लाईफसाठी देखील ओळखली जाते. आज आपण अभिनेत्री नयनताराच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन अस आहे. तिचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये झाला होता, पण 2011 मध्ये तिने हिंदू धर्म स्वीकारला.

नयनताराचा जन्म बेंगलोर, कर्नाटकमध्ये झाला होता. तिचे वडील भारतीय वायू सेनेमध्ये होते. यामुळे तिला देशभर फिरावे लागले. तिने आपले बालपण भारताच्या विविध भागामध्ये घालवले, विशेष म्हणजे उत्तर भारत मध्ये. तिने आपले शालेय शिक्षण आणि कोलेजचे शिक्षण उत्तर भारतामध्येच पूर्ण केले. तिचा भाऊ दुबईमध्ये राहतो.

Nayanthara Net Worth 2023

InformationNayanthara
NameNayanthara (Diana Mariam Kurian)
Date of BirthNovember 18, 1984
Age38 years
BirthplaceBangalore, India
ProfessionActress, Film Producer
Nayanthara Net Worth (2023)200 Crore INR
RelationshipMarried to Vignesh Shivan
LanguagesTamil, Telugu, Malayalam
Social MediaInstagram
Car CollectionBMW 7 Series, Ford Endeavour, Toyota Innova Crysta, BMW 5 Series, and Mercedes Maybach GLS600

100 करोडचे घर

नयनताराकडे देशभरामध्ये अनेक आलिशान घरे आहेत. हैदराबाद, चेन्नई, केरळ आणि मुंबईमध्ये तिचे घर आहे. तिची केरळमधील संपत्ती कुटुंबाची आहे, हैदराबाद येथील बंजारा हिल्समध्ये स्थित तिचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. सध्या ती पती विग्नेश शिवनसोबत चेन्नईमध्ये एका 4 BHK फ्लॅटमध्ये राहते. या फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये असून यात जिम, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूलही आहे.

जाहिरातीमधून कमवते करोडो (Nayanthara Net Worth)

चित्रपटाशिवाय साउथ अभिनेत्री नयनतारा जाहिरातींद्वारे देखील बक्कळ कमाई करते. बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींप्रमाणे, नयनतारा एका जाहिरातीस्तही जवळ जवळ 5 करोड रुपये चार्ज कर्त्रे. ती एका ब्रँडच्या प्रचारासाठी ती 4-7 कोटी रुपये घेते. नयनतारा तनिष्क सारख्या इतर अनेक ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

कार आणि बॅगची आवड

नयनताराला लक्झरी कार्स आणि बॅगची खूप आवड आहे. तिच्याजवळ 350D आणि बीएमडब्ल्यू 5 सिरीजसारख्या महागड्या कार्स आहेत. कारशिवाय तिच्याजवळ फ्रांसचा लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनच्या अनेक बॅग्स आहेत. या ब्रँडच्या एका बॅगची किंमत 6 लाखांपेक्षा जास्त आहे.

प्राईवेट जेटची मालकीण

नयनतारा एक अभिनेत्री आहे आणि तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत चित्रपट आणि जाहिराती आहे. तिने आपल्या उत्पन्नसाठी एक हिस्सा प्राईवेट जेट खरेदी करण्यासाठी खर्च केला आहे. नयनताराने जून 2022 मध्ये 50 करोडचे प्राईवेट जेट खरेदी केले होते. या जेटमध्ये ती अनेक वेळा पती विग्नेश सोबत सुट्ट्या घालवण्यासाठी जाताना दिसली आहे. तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल देखील झाले होते.

Nayanthara Net Worth

ब्यूटी ब्रँडची मालकीण

नयनतारा एक सफल अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. तिने स्वतःची लिप बाम कंपनी सुरू केली आहे. शिवाय तिने अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. नुकतेच तिने चेन्नईस्थित बिजनेस चाय वाले आणि UAE च्या ऑइल बिज़नेसमध्ये 100 करोडची गुंतवणूक केली आहे.

Nayanthara Net Worth

Nayanthara Net Worth जवळ जवळ 200 करोड आहे. तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत चित्रपट आणि जाहिराती आहे. शिवाय तिची स्वत:ची लिप बाम कंपनी आणि इतर व्यवसायांमधून देखील तिची चांगली कमाई होते.

हेही वाचा: Rashmika Mandanna Income: नेट वर्थ, हाऊस, कार्स, बॉयफ्रेंड