Savitribai Phule Jayanti Bhashan: 3 जानेवारी रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती (Savitribai Phule Jayanti 2024) साजरी केली जाते. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे महत्वाचे काम सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी केले. त्यांची जयंती बालिका दिन म्हणून देखील साजरी केली जाते.
सावित्रीबाई फुले यांची जयंती 194 वी जयंती 3 जानेवारी 2024 रोजी साजरी करण्यात येत आहे. देशामध्ये तसेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये देखील सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. यावेळी शाळांमध्ये त्यांच्यावर आधारित भाषणे (Savitribai Phule Jayanti Bhashan) देखील सादर केली जातात. त्यानिमित्त आम्ही इथे सावित्रीबाई फुले यांच्यावरील काही मराठी भाषणे घेऊन आलो आहोत.
सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी – 1 (Savitribai Phule Jayanti Bhashan)
ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?
ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे.
फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. माझा हात घर-घर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं. मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीच.
एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली 1 जानेवारी होय. शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा.
शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत. वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं.
सनातनांचा मात्र धर्म बुडाला. धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.
शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत. ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते. शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले,
शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या ‘शिकविण पोरीना’ असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला,’ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण. कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते.
मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच. त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल. शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.
दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता. लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं. 4 वर्षातच आमच्या 18 शाळा झाल्या. पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या. अशातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.
जय हिंद जय महाराष्ट्र.
सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी – 2 (Savitribai Phule Jayanti Bhashan)
आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिनिनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत.
बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते तर आईचे नाव लक्ष्मी होते.
सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पालकांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. गावचे पाटील असणाऱ्या नेवासे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.
वयाच्या 9 व्या वर्षी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावातील 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला होता. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे ठरवले.
848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली. समाजाची होणारी टीका सहन करत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली. त्यानंतर हळूहळू 18 शाळा उघडल्या.
भिडे वाड्यात सुरू केलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या. पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. मुली शाळेत येत असल्यातरी सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या टीकेला समोरे जावे लागत होते.
महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावं लागणारा त्रास पाहून ज्योतिराव फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी काही तरी मदत करण्याचं ठरवलं. दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.
प्लेगची लागण झाल्याने सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले. 1897 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे प्लेगची साथ आली होती. या आजाराची अनेकांना लागण झाली होती. तसेच या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली होती.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने संभाव्य प्लेगच्या रुग्णांना क्वारंटाईन करण्याची योजना आखली. तेव्हा सावित्रीबाईंनी पुढे येत प्लेगच्या रुग्णांसाठी पुण्याजवळील ससाणे येथील माळावर दवाखाना सुरु केला. मात्र, रग्णसेवा करत असतानाचे सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
सावित्रीबाई फुले भाषण निबंध मराठी – 3 (Savitribai Phule Jayanti Bhashan)
आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिनिनो आज, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण मोहिमेबद्दल बोलण्याचा मला सन्मान वाटतो, ज्याने 19व्या शतकातील भारतात स्त्रियांना कसे मानले आणि वागवले गेले. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कल्पक दृष्टीकोनातून हे ओळखले की शिक्षण हा महिलांना सक्षम करण्याचा आणि समाज सुधारण्याचा मार्ग आहे. मुलींच्या शाळा बांधण्याच्या तिच्या अग्रगण्य प्रयत्नांनी केवळ परंपरागत मानकांनाच आव्हान दिले नाही, तर स्त्रियांना त्यांच्यावरील बंधने ओलांडण्यासाठी एक व्यासपीठही दिले.
सावित्रीबाईंनी स्त्री-पुरुष मर्यादा मोडून काढल्या आणि पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा निर्माण करून समान शैक्षणिक संधी निर्माण केल्या. स्त्रियांना अज्ञान आणि असमानतेच्या बंधनातून मुक्त व्हावे म्हणून त्यांना शिक्षित करणे हा तिचा उद्देश होता. सावित्रीबाईंच्या अतुलनीय दृढनिश्चयाने एक लहरी प्रभाव निर्माण केला ज्यामुळे अनेक स्त्रियांना शिक्षण घेण्यास आणि बदलाचे एजंट बनण्यास प्रेरित केले. तिच्या शाळांनी मुली आणि स्त्रियांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, पारंपारिक नियमांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास प्रोत्साहित करून एक आदर्श बदल घडवून आणला.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यक्रमाने भारतातील महिला हक्क चळवळीची पायाभरणी केली. तिची दूरदृष्टी आणि प्रयत्न आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत, आणि अधिक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करून देत आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि महिलांना त्यांची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवून तिचे स्मरण करूया.