कमी बजटमध्ये 190 किमीची रेंज! अप्रतिम इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Ola S1 X 4kWh: ओला इलेक्ट्रिकने नवीन S1 X 4 kWh इलेक्ट्रिक स्कूटर व्हेरिएंट लाँच करण्याची घोषणा केली आहे, जी कमी किंमतीमध्ये जास्त रेंज ऑफर करते. नवीन Ola S1 X 4 kWh सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज देण्याचा दावा करते. 4 kWh बॅटरी पॅक ई-स्कूटरच्या S1 X लाइनअप मध्ये सर्वात मोठा आहे. याची किंमत 1.10 लाख रुपये आहे, जे S1 X 3 kWh व्हेरिएंट पेक्षा जवळ जवळ 20,000 रुपयांनी महाग आहे. तर एंट्री-लेवल Ola S1 X 2 kWh ट्रिमची किंमत 79,999 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूमच्या आहेत.

Ola S1 X 4kWh मध्ये Ola S1 X 3kWh व्हेरिएंट सारखेच मॅकेनिकल फीचर्स मिळणार. हि 0-40 किमी प्रति तासाचा वेग 3.3 सेकंदात गाठण्यास सक्षम आहे तर याची टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 6 किलोवॅटची आहे जी 8 बीएचपी पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड असतील.

केव्हा होणार 3 kWh व्हेरिएंटची डिलिव्हरी? – Ola S1 X 4kWh

ओलाने हि पुष्टी केली आहे कि S1 X 2 kWh आणि 3 kWh व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिल 2024 पासून सुरु होनील. नवीन S1 X 4 kWh व्हेरिएंटची डिलिव्हरी देखील एप्रिलमध्येच सुरु होईल. तर टॉप-रेंज व्हेरिएंट साठी बुकिंग आता ओपन आहे.

600 सर्विस स्टेशन्सची उपलब्धता

शिवाय कंपनीने 600 सर्विस स्टेशन्सच्या उपलब्धतेची घोषणा केली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवालने घोषणा केली आहे कि कंपनी पुढच्या तिमाहीपर्यंत चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरला 10,000 फास्ट चार्जर वितरीत करेल. कंपनीचा दावा आहे कि हा नवीन चार्जर सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असेल. हा ओला स्कूटरसोबत येणाऱ्या मानक चार्जरपेक्षा 70-80% वेगवान असेल.

12,999 रुपयांपासून सुरुवात

ओलाने स्कूटर्सच्या किंमतीसोबत 8 वर्षाची नवीन वॉरंटी समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. कंपनी ही वॉरंटी 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर या वॉरंटीला 1,25,000 पर्यंत वाढवण्याची देखील ऑफर देईल.

हेही वाचा: ओला-एथर च्या किमतीती घसरण, आता पेट्रोल स्कूटर्सच्या किंमतीत खरेदी करा ई-स्कूटर