प्रसिद्ध मराठी अभिनेत्यांने आई-बाबांना भेट दिली महागडी कार, व्हिडीओ शेयर करत म्हणाला; “तू आहेस तर आई…’

Santosh Juvekar Gifted a Car to Parents: साध्य अनेक मराठी कलाकार आनंदाची बातमी देत आहेत. गेल्या वर्षी अनेक कलाकारांनी स्वतः घर खरेदी केलं होतं तर कोणी विवाहबंधनात अडकलं होतं. आता नुकतेच आणखी एका मराठी अभिनेत्यांने आनंदाची बातमी शेयर केली आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतःसाठी काहीही न करता त्याच्या आई-बाबांसाठी एक नवी कोरी कार खरेदी केली आहे.

Santosh Juvekar ने आईवडिलांना भेट दिली कार

‘मोरया’, ‘झेंडा’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) ने नुकतेच त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेमध्ये आला आहे. संतोष (Santosh Juvekar) नेहमी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात राहत असतो. त्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून त्याच्या आई-बाबांचा एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये तो त्यांना एक नवी कोरी कार गिफ्ट देताना पाहायला मिळत आहे.

Santosh Juvekar Gifted a Car to Parents

संतोष जुवेकरचा व्हिडीओ व्हायरल

संतोषच्या या व्हिडीओ ची चर्चा सर्वत्र होत आहे. संतोषने नवीन गाडी घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हि कार त्याने त्याच्या आई-बाबांसाठी खरेदी केली आहे. त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर याचा आनंद स्पष्ट पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवरून लाइव येत त्याने हा व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओ शेयर करताच तो अल्पावधीमध्ये व्हायरल झाला आहे. चाहते आणि अनेक कलाकार त्याच्या व्हिडीओवर कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत.

संतोषच्या आईवडिलांनी दिली प्रतिक्रिया

व्हिडीओमध्ये व्हिडीओ शेयर करत कॅप्शनमध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं, काय असत पुण्य की जे ह्यांच्या डोळ्यात दिसतं. आई बाबा आय लव्ह यू. असं लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये त्याचे आईवडील दिसत आहेत. संतोष त्याच्या बाबांना विचारतो कि गाडी कशी वाटली तेव्हा त्याचे बाबा म्हणतात कि, आता हि गाडी आयुष्याला पुरेल, तर त्याची आई म्हणते माझ्या लेकाने नवी गाडी घेऊन दिली. त्यावर संतोष म्हणतो कि तू आहेस तर 15 गाड्या येतील.

चाहत्यांना केली कौतुकाचा वर्षाव

संतोषने शेयर केलेल्या व्हिडीओ वर चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि तू आज आईबाबांना भेट दिलीस तुझी अशीच प्रगती होत राहो म्हणत त्याला आशीर्वाद दिले आहेत.

हेही वाचा: श्रेयस तळपदेला लेकीने असं दिलं वाढदिवसाचं सरप्राईज! पाहा खास व्हिडीओ…