महाराष्ट्रातील गावात फार्महाऊस बांधून शेतीमध्ये रमलाय ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, म्हणतो; ‘मुंबईमध्ये आता…’

Sanjay Mishra Farm House: अभिनेता संजय मिश्राचे पण आता त्यांनी महाराष्ट्रामधील तिस्करी गावामध्ये आपले एक झोपडीसारखे घर बनवले आहे. शिवाय संजय मिश्रा तिथे एक फार्महाऊस देखील बनवत आहेत. जे पावणे दोन एकरमध्ये पसरलेले आहे. संजय मिश्राने इथे फळांची आणि भाज्यांची शेती देखील केली आहे. अभिनेत्याने नुकतेच आपल्या फार्महाऊस आणि घराची झलक (Sanjay Mishra Farm House) आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केली आहे आणि सांगितले आहे कि त्यांनी मुंबईपासून 140 किमी दूर गावामध्ये घर बनवण्याच्या निर्णय का घेतला.

Sanjay Mishra Farm House

Sanjay Mishra Farm House

संजय मिश्राने सांगितले कि आता त्यांचे मुंबईमध्ये मन लागत नाही. यामुळे त्यांनी तिस्करी गावामध्ये आपले घर आणि फार्महाऊस (Sanjay Mishra Farm House) बनवले आहे. अभिनेता म्हणाला कि इथे येऊन तो ग्रामीण जीवन जगतो आणि शेती करतो. संजय मिश्राने म्हंटले कि त्याला नेहमी अशाप्रकारचे जीवन जगायचे होते.

Sanjay Mishra Farm House

हँडपंप खाली अंघोळ, झोपडी सारखे घर

संजय मिश्राने इथे एक हँडपंप लावला आहे आणि तो तिथेच अंघोळ देखील करतो. इतकेच नाही तर गावामध्ये येणारे पाणी देखील पितो. संजय मिश्राने मुंबईमधून आर्ट डायरेक्टर बोलावून एक छोटे घर बनवले आहे, ज्यामध्ये फक्त एक बेडरूम आहे. हे घर एखाद्या झोपडीसारखे आहे. (Sanjay Mishra Farm House) संजय मिश्राचे हे घर पूर्णपणे लाकडाने बनवले गेले आहे. यामध्ये सिमेंट, वाळू किंवा विटांचा वापर करण्यात आलेला नाही.

Sanjay Mishra Farm House 4

भाजी आणि कडधान्यांची शेती

संजय मिश्रा आता इथे भाजीची शेती देखील करतात. इथे त्यांनी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, पालक अशा भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. तर काही कडधान्यांचे पिक देखील घेत आहेत. ते स्वतः शेतीची देखरेख करतात. संजय मिश्राने सांगितले कि संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबासोबत इथे येऊन राहणार आहेत. संजय मिश्रा म्हणाले कि ते खेडेगावातील असून देखील त्यांना तिथे राहता आले नाही कारण त्यांच्या वडिलांची एक शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये नेहमी ट्रांसफर होत असायची. यामुळे त्यान कधी गमध्ये राहण्याचा आनंद मिळाला नाही.

Sanjay Mishra Farm House

बैलांनी नांगरतात शेती

संजय मिश्राने सांगितले कि ते आपल्या शेतामध्ये बैलांच्या मदतीने नांगरणी करतात. इतकेच नाही तर ते जमिनीवर बसून आरामाने जेवण करतात. संजय मिश्रा यांनी आपल्या फार्महाऊसमध्ये एक पर्सनल घाट देखील बनवला आहे, नंतर त्यामध्ये पाणी भरले जाईल. इतकेच नाही तर इथे त्यांनी एक मंदिर देखील बनवले आहे. संजय मिश्राचे बालपण बनारसमध्ये गेले आणि तिथे ते मोठे झाले. यामुळे घाटावर मंदिर बनवून ते बनारससारखा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: सलमान पासून जुही चावला पर्यंत, शेतीमध्ये रमले बॉलीवूडचे ‘हे’ स्टार्स, पहा फोटोज