Operation Valentine Teaser: विक्की कौशलचा सर्जिकल स्ट्राइक विसरून जाल, साऊथच्या ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’चा जबरदस्त टीजर रिलीज

Operation Valentine Teaser: बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा उरी द सर्जिकल एयरस्ट्राइक चित्रपट तर आठवणीत असेलच. चित्रपटाने दर्शकांचे मन जिंकले होते. यानंतर कंगना रनौतचा तेजस चित्रपट देखील रिलीज झाला होता. तथापि चाहत्यांना तो फारसा काही आवडला नाही. पण आता साऊथच्या ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या टीजरने (Operation Valentine Teaser) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे आम्ही म्हणत नाही आहोत तर लोकांनी टीजरच्या कमेंटमध्ये भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

Operation Valentine Teaser

Operation Valentine Teaser रिलीज

ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आणि करमणुकीने भरलेला आहे. चित्रपटामध्ये आपल्याला हवाई दलाच्या हिरोजना फ्रंट लाईनवर आव्हानांचा सामना करताना पाहायला मिळणार आहे. जेव्हा त्यांनी भारताच्या अतार्पर्यंतच्या सर्वात खतरनाक हवाई हल्ल्याचा सामना केला होता. चित्रपटामध्ये वरुण तेज आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

Also Read:  प्रभास आणि यशपेक्षा देखील खतरनाक आहे ‘बघीरा’, अंगावर शहारे आणणारा टीजर रिलीज

भारतीय सैनिकांच्या शौर्याचा उत्सव साजरा करणारा ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपट शक्ति प्रताप सिंह हदा, आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार यांनी लिहिलं आहे, जो तेलगु आणि हिन्दी अशा दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर कमेंटमध्ये एका युजरने लिहिले आहे कि, भारताच्या दमदार एअरस्ट्राईक अ‍ॅक्शन चित्रपटासाठी तयार राहा. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि टीजर पाहिल्यानंतर देशासाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण झाली आहे. तर तिसऱ्या एकाने लिहिले आहे कि मुख्य पात्रांची केमेस्ट्री अप्रतिम आहे.

Leave a Comment