Pankaj Udhas Death: मनोरंजन विश्वामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायब उधास हिने त्यांच्या निधनाची बातमी शेयर केली आहे. पोस्ट शेयर करत तिने लिहिले आहे कि कि, आम्हाला सांगताना अत्यंत दु:ख होत आहे कि, पद्मश्री पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन (Pankaj Udhas Death) झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना वयाशी संबंधित आजार होते. 10 दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंकन उधास यांचे निधन
पंकज उधास यांच्या पीआरने सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गायकाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संगीतविश्वामध्ये शोककळा पसरली आहे. पंकजसारख्या गझल गायकाच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडियावर चाहते त्यांना श्रद्धांजलि देत आहेत.
पंकज उधास यांच्या निधनावर (Pankaj Udhas Death) सेलेब्स देखील दुखी आहेत. सिंगर आणि म्युझिक कंपोजर शंकर महादेवन यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या नुसार पंकज यांचे जाने मुझिक जगतामधील मोठे नुकसान आहे. ज्याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही. सोनू निगमने देखील त्यांच्या निधनावर इमोशनल पोस्ट शेयर करून शोक व्यक्त केला आहे.
लहानपणापासून सुरु झाले होते म्युझिकल करियर
पंकज यांच्या म्युझिकल करियरची सुरुवात वयाच्या 6 व्या वर्षापासून झाली होती. त्यांच्या घरामध्ये संगीताचे वातावरण होते. हे पाहता ते देखील या क्षेत्रामध्ये आले. पंकज उधास यांनी सांगिते होते कि त्यांचा संगीताशी पहिला एक्सपोजर शाळेमध्ये प्रार्थना सुरु करण्यापासून झाला होता.
1980 मध्ये त्यांचा पहिला अल्बम आहट आला होता. यामध्ये त्यांनी अनेक गझल गायल्या होत्या. पंकज उधास आपल्या गझल गायकीसाठी खूप फेमस होते. ‘जिएं तो जिएं कैसे बिन आपके…’, ‘चिट्ठी आई है…’, ‘चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल…’, ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार…’ हि त्यांची काही सुपरहिट गाणी आहेत.
वैयक्तिक आयुष्यात कसे होते पंकज उधास?
सिंगर पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातच्या जीतपुरमध्ये झाला होता. त्यांचे वडील शेतकरी होते. दोघे भाऊ देखील सिंगर होते. पंकज खूपच सिंपल लाईफ जगत होते. 2006 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर पंकज यांनी फरीदाशी लग्न केले. त्याला तीन मुली आहेत.