Rakul Preet Wedding: बॉलीवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी नुकतेच लग्न केले आहे. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर अभिनेत्री आता तिच्या प्रत्येक फंक्शनची झलक चाहत्यांसोबत शेयर करत आहे. दरम्यान रकुलप्रीतने तिला लग्नानंतर मिळालेल्या खास भेटवस्तूची झलक दाखवली आहे.
रकुलप्रीत आणि जॅकीला मिळाले श्रीरामचे आशीर्वाद
रकुलप्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने अयोध्येतून आलेल्या प्रसादाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच फोटोमध्ये एक बॉक्स पाहायला मिळत आहे. यासोबत एक पुस्तक देखील पाहायला मिळत आहे. ज्यावर प्रसादम लिहिले आहे. हा खास प्रसादम कपलला त्यांच्या लग्नानिमित्त (Rakul Preet Wedding) अयोध्येतून पाठवला गेला आहे. हि स्पेशल भेट मिळाल्यानंत कपल खूपच खुश आहे. याचा फोटो शेयर करत रकुलने आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले आहे कि, आमच्या लग्नानंतर अयोध्येतून प्रसादम मिळाल्यामुळे आम्हाला खूपच धान्य वाटत आहे.
गोव्यामध्ये केले लग्न
रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी कायमचे एक झाले आहेत. 21 फेब्रुवारी रोजी गोव्यामध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. रकुलप्रीत (Rakul Preet Wedding) आणि जॅकीचे दोन प्रकारे लग्न केले. या कपलने दोन्ही लग्नासाठी वेगवेगळा लुक निवडला होता. ज्यामध्ये दोघे खूपच क्युट दिसत होते. या कपलच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
मुंबईमध्ये होणार रिसेप्शन
लग्नानंतर रकुल आणि जॅकीने मीडियासमोर पोज दिली आणि त्यांना मिठाईही वाटली. आता रकुलप्रीत आणि जॅकी भगनानी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. सध्यातरी या कपलच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख समोर आलेली नाही.
News Title: rakul preet wedding special gift
हेही वाचा: रकुल प्रीतच्या ब्राइडल एंट्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, ब्राइडल एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल