आली लग्न घटीका समीप! पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहेंदी, फोटोज व्हायरल

Pooja Sawant Wedding: अभिनेत्री पूजा सावंत हि सिद्धेश चव्हाणसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लगीनघाई सुरु असून दोघांच्या लग्नाच्या विधी पार पडत आहेत. पूजा आणि सिद्धेश यांच्या संगीत सोहळ्यानंतर आता पूजाचा मेहेंदी सोहळा देखील पार पडला आहे. पूजाने मेहेंदी सोहळ्यामधील फोटो शेयर केले आहेत जे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

पूजाने शेयर केले मेहेंदीचे फोटो

अभिनेत्रीने नुकत्याच पार पडलेल्या तिच्या मेहेंदी सोहळ्यामधील तिचे काही फोटो शेयर केले आहेत. काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सिद्धेशसोबतच्या रिलेशनबद्दल कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा देखील संपन्न झाला. आता पूजा आणि सिद्धेशच्या लग्न सोहळ्यामध्ये देखील त्यांच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. आता लवकरच हे कपल लग्नबंधनात (Pooja Sawant Wedding) अडकणार आहे.

Pooja Sawant Wedding

पूजा सावंतच्या मेहेंदीचे फोटो

पूजा सावंतने मेहेंदीचे फोटो शेयर करताच चाहते तिच्या फोटोवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. फोटो काही क्षणांमध्येच सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. गुलाबी रंगाचा लेहेंगा पूजाने यादरम्यान तिच्या मेहेंदी सोहळ्यासाठी निवडला होता. या लेहेंग्यामध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती.

काही दिवसांपूर्वी पूजाचा साखरपुडा देखील पार पडला होता. पूजाने अचानक साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. सध्या पूजाच्या साखरपुड्यापासून तिच्या लग्नापर्यंत खूप चर्चा होत आहे. आता ती येत्या दोन दिवसांमध्ये लग्नबंधनात (Pooja Sawant Wedding) अडकणार असल्याचे म्हंटले जात आहे.

पूजा सावंत वर्कफ्रंट

पूजा सावंतने तिच्या अभिनयाच्या बळावर दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्री एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. पूजा सावंतचं नाव वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं. दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्री पाहायला मिळाली होती. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत.

News Title: pooja sawant wedding mehendi photo