Rakul-Jackky Wedding Photo: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे 21 फेब्रुवारी रोजी लग्न झाले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले. दोघेही फोटोंमध्ये (Rakul-Jackky Wedding Photo) खूपच क्युट दिसत आहेत. दोघांनी आपल्या लग्नासाठी गोव्यातील बीच सिटीची निवड केली होती. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.
20 फेब्रुवारी रोजी रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचा संगीत सोहळा होता. संगीत सोहळ्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्र यांनी शानदार परफॉर्मन्स दिला, ज्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता चाहते दोघांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासोबतच या कपलला अनेक शुभेच्छाही दिल्या जात आहेत.
रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो व्हायरल
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात एका सोहळ्यात विवाहबद्ध झाले. आयटीसी ग्रँड साऊथ गोवा येथे हा विवाहसोहळा पार पडला. जॅकी आणि रकुल यांनी आनंद कारज आणि सिंधी पद्धतीने लग्न केले. रकुल प्रीत सिंहचा चुडा सोहळा सकाळीच पार पडला. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता गोव्यातील ITC ग्रँड साऊथमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो (Rakul-Jackky Wedding Photo) सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर नवविवाहित कपल आता सर्व पाहुण्यांसाठी एका पार्टीचे आयोजन करणार आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबीय या आनंदाच्या क्षणी कपलसोबत सामील होणार आहेत. शिल्पा आणि राज शिवाय रकुल चे जवळचे मित्र आणि अभिनेता वरुण धवनने रकुल आणि जॅकीसाठी खास परफॉर्मन्स दिला. संगीत सेरेमनीमध्ये वरुणने ‘कुली नंबर 1’मधील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केला.