राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका व्हायरल

Rakul Preet Singh Wedding Card: बॉलीवूडमधील न्यू लव बर्ड राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. सध्या दोघांच्या लग्नाबद्दल मोठा सस्पेंस बनला होता जो आता संपला आहे. राकुल आणि जॅकीच्या लग्नाचे कार्ड (Rakul Preet Singh Wedding Card) समोर आले आहेत. या सुंदर वेडिंग कार्ससोबत सेलेब्सच्या लग्नाची तारीख 21 फेब्रुवारी कंफर्म झाली आहे. लग्नाच्या कार्डच्या पाठीमागे बॅकग्राउंड मध्ये बीच व्हिव आहे. ज्यावरून हे स्पष्ट होते कि दोघे गोवामध्ये लग्न करणार आहेत.

व्हायरल होत आहे वेडिंग कार्ड

राकुल आणि जॅकीची पत्रिका (Rakul Preet Singh Wedding Card) पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या थीमवर आधारित आहे. यासोबतच साईडला पिंक कलरचे फ्लॉवर आणि बॅकग्राउंड मध्ये बीच दिसत आहे. या कार्डच्या एका लिहिले आहे कि राकुल आणि जॅकी आता दोघांनी पळायचे नाही. तर कार्डच्या दुसऱ्या पेजवर फेरा लिहिलं आहे आणि खाली तारीख लिहिली आहे 21 फेब्रुवारी 2024. याच्या खाली हवन कुंद आणि मागे बॅकग्राउंडमध्ये समुद्र दिसत आहे. राकुल आणि जॅकीच्या लग्नाची पत्रिका खूपच व्हायरल झाली आहे.

काय असे वेडिंग आउटफिट

राकुल आणि जॅकीच्या वेडिंग आउटफिटबद्दल देखील चाहते अंदाज लावत आहे आणि खूपच उत्साहित आहेत. तथापि वेडिंग आउटफिटबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण इतके निश्चित आहे कि कपल सब्यसाची किंवा मनीष मल्होत्रा यांच्यापैकी एका डिझाईनरला नक्कीच सिलेक्ट करू शकतात. तर अशी देखील बातमी आहे कि कपल तरुण तहिलियानी किंवा संदीप खोसला आणि अबु जानी यांचे कलेक्शन देखील आपल्या खास दिवशी सिलेक्ट करू शकतात.

जॅकीचे घर सजले

व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेदरम्यान सोशल मिडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जॅकीच्या घराचा आहे. व्हिडीओमध्ये जॅकीच्या घराला सुंदर सजवत केलेली पाहायला मिळत आहे.

News Title: rakul preet singh wedding card viral