अंगणातली तुळस, बागेतलं राम मंदिर, अमिताभ बच्चन यांनी शेयर केले जलसामधील खास फोटो

Amitabh Bachchan Jalsa Temple: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन देशामधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या अभिनयासोबतच अनेकवेळा त्यांच्या पर्सनल लाईफ संबंधी अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेयर करत असतात. बिग बींनी जलसा येथील त्यांच्या घरी असलेल्या मंदिराचा फोटो (Amitabh Bachchan Jalsa Temple) शेअर केला आहे. जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

शेयर केले घरातील मंदिराचे फोटो

12 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चनने आपल्या एक्स अकाऊंटवरून मुंबईमधील आपल्या जलसा निवासस्थानातून आपल्या सुंदर संगमरवरी मंदिराच्या (Amitabh Bachchan Jalsa Temple) अनेक झलक शेयर केल्या. पहिल्या दोन फोटोंमध्ये अमिताभ बच्चन श्री रामाच्या मूर्तीसमोर जल अर्पण करतना दिसत आहेत तर इतर फोटोंमध्ये अंगणातील तुळसीला पाणी घालताना दिसत आहेत.

हे फोटो (Amitabh Bachchan Jalsa Temple) शेयर करताना अमिताभ बच्चनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, टी 4918 आस्था, शिवजींना दुध आणि तुळसीला दुध अर्पण करणे. यादरम्यान अभिनेत्याने काळ्या रंगाची हुडी आणि मॅचिंग पँट घातली होती. सध्या अमिताभ बच्चन यांचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

पुन्हा घेतले रामलल्लाचे दर्शन

नुकतेच अमिताभ बच्चन हे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 17 दिवसानंतर रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी पोहोचले होते. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेयर केले होते. यादरम्यान ते श्री रामाची पूजा करताना देखील दिसले होते. 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये राम मंदिराचे उद्घाटन केले गेले होते आणि या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामध्ये बिग बी देखील सामील झाले होते.

Amitabh Bachchan Home Temple

वर्क फ्रंट

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते गणपथ चित्रपटामध्ये शेवटचे पाहायला मिळाले होते. ज्यामध्ये टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. तथ्पाई हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. अमिताभ बच्चन आता दीपिका पादुकोण आणि प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या सायन्स-फिक्शन ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपट 9 मे 2024 रोजी थियेटरमध्ये रिलीज होणार आहे.

News Title: amitabh bachchan jalsa temple

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांनी दोन आठवड्यानंतर पुन्हा घेतलं रामलल्लाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल