‘वहिनी खूपच….’ जसप्रीत बुमराहच्या पत्नीवर व्यक्तीने केली घाणेरडी कमेंट, संजनाने केली बोलती बंद!

Sanjana Ganesan: भारतीय क्रिकेटर्सची लव्ह स्टोरी खूपच चर्चेमध्ये राहते. क्रिकेटरप्रमाणे त्यांच्या पत्नीदेखील नेहमी लाइमलाइटमध्ये राहतात. क्रिकेटर्स जेव्हा मैदानामध्ये चौकार-षटकार मारतात तेव्हा त्यांच्या पत्नी देखील खूप चर्चेमध्ये राहतात. अनेक क्रिकेटर्स च्या पत्नी सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. ती नेहमी तिच्याबद्दल आणि पती जसप्रीत बुमराहबद्दल अपडेट शेयर करत असते. यादरम्यान जसप्रीत बुमराहने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, जी पाहिल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला वाईटरित्या ट्रोल केले. प्रकरण इथेच थांबले नाही तर जसप्रीत बुमराहची पत्नी यावर खूप भडकली.

संजनाने ट्रोलला दिले उत्तर

जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशन सोबत एक पोस्ट शेयर केली आहे. फोटो शेयर करत त्याने कॅप्शनमध्ये आनंद इथे आहे असे लिहिले आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी ही प्रमोशनल पोस्ट पाहिल्यानंतर एका यूजरने संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांना ट्रोल केले. त्याने बॉडी शेमिंग कॉमेंट केली, जी पाहिल्यानंतर संजना खूपच भादली आणि तिने युजरचा चांगला क्लास घेतला. युजरने कमेंटमध्ये ‘वहिनी जाड दिसत आहेत.’ अशी कमेंट केली. यावर संजनाने प्रतिक्रिया देत लिहिले कि तुम्हाला शालेय विज्ञानाची पुस्तकेही आठवत नाहीत, तुम्ही महिलांच्या शरीरावर भाष्य करत आहात. पळा इथून…

चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ने दिलेल्या उत्तरानंतर तिचे सर्वजण कौतुक करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे कि ज्याप्रकारे त्या व्यक्तीने तिच्यावर कमेंट केली ती पूर्णपणे चुकीची आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे कि बॉडी शेमिंग विनोदाम्धेय घेतली जाऊ शकत नाही. तर एका युजरने म्हंटले कि संजना नुकतेच आई झाली आहे आणि प्रेग्नंसीदरम्यान वजन वाढणे नैसर्गिक आहे.

Sanjana Ganesan

नुकतेच बनले आई-बाबा

संजना गणेशन एक स्पोर्ट्स अँकर आहे. नुकतेच जसप्रीत आणि संजना आई-वडील झाले. त्यांनी एका गोड मुलाचे या जगामध्ये स्वागत केले. जसप्रीत बुमराह गुरुवारी राजकोट येथे इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळताना पाहायला मिळणार आहे. सिरीजमध्ये एक-एक ने बरोबरी साधल्यानंतर आता भारत हा सामना जिंकून सिरीजमध्ये 2-1 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

News Title: sanjana ganesan furious reply body shamed

हेही वाचा: छोटा जसप्रीत बुमराह! लहान मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची हुबेहूब कॉपी, व्हिडीओ व्हायरल