वर्ल्डकप खेळण्याची संधी गमवणारा Sanju Samson भावूक, म्हणाला; ‘तीन ते चार महिने…’

भारताने संजू सॅमसनच्या (Sanju Samson) शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 78 धावांनी जिंक मालिका जिंकली. यासोबत टीम इंडिया दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकामध्ये वनडे सिरीज जिंकण्यात यश मिळवले. सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Sanju Samson

संजू सॅमसन (Sanju Samson) ने शानदार फलंदाजी करत, वनडे फॉरमॅटमधील आपले पहिले शतक झळकावले. संजूने 114 चेंडूंचा सामना करत 108 धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील देण्यात आला. यावेळी संजूने भावूक होत मोठं वक्तव्य केले आणि त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल तो उघडपणे बोलला.

माझ्यासाठी 3 ते 4 महिने कठीण होते – Sanju Samson

संजू सॅमसनने (Sanju Samson) सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले कि, गेले तीन चार महिने माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते, यामुळे सगळ्यामधून गेल्यानंतर मला इथे आल्यानंतर वाटते कि मी आज जे काही केले त्यामुळे मी खुश आहे. एक भारतीय खेळाडू असल्यामुळे तुमच्यावर नेहमीच मिडियाचे दडपण असते, मग तुम्ही मैदानामध्ये असा किंवा मैदानाबाहेर. मी त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो जे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत.

Sanju Samson

संजू पुढे म्हणाला, प्रत्येकाची मते वेगळी असतात पण तुम्हाला नेहमी स्वतःला अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये केलरच्या टीमसोबत राहून खूप मेहनत केली होती. मी नेहमी स्वतःला प्रश्न विचारत होतो कि मला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त सुधारणा केली पाहिजे. जरा विचार करा, तुम्ही स्वतःवर किती काम करू शकता आणि अधिक मजबुतीने पुनरागमन करू शकता.

वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी पर्याय ठरू शकतो संजू

वनडे वर्ल्ड कप संपल्यानंतर लिमिटेड ओवर्सच्या भारतीय संघामध्ये (Indian Cricket Team) अनेक बदल पाहायला मिळत आहेत.यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पूर्णपणे युवा संघ पाठवण्यात आला होता. संजू सॅमसन वनडे फॉर्मेटमध्ये नंबर-3 वर आपली दावेदारी सिद्ध करू शकतो. संजू सॅमसनने 2021 मध्ये डेब्यू केला होता, त्याने आतपर्यंत 16 वनडे सामन्यांमध्ये 56.67 च्या सरासरीने 510 धावा बनवल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक सामील आहे शिवाय त्याचे तीन अर्धशतके देखील सामील आहेत.

हेही वाचा: 20 लाख बेस प्राईस असलेल्या खेळाडूला धोनीच्या टीमने तब्बल 8.40 करोडला केले खरेद, रैनासोबत आहे खास रिलेशन

Leave a Comment