प्राजक्ता माळीच्या “प्राजक्तकुंज”ची वास्तुशांती पूजा संपन्न, कुटुंबियांसोबत शेयर केले फोटो

Prajakta Mali New Home Prajktkunj: मराठी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्य जत्राची होस्ट प्राजक्ता माळीने नुकतेच कर्जत येथील महाराष्ट्राच्या नयनरम्य पर्यटन स्थळी फार्महाऊस विकत घेऊन तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन अध्याय जोडला आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या फार्महाऊसवर वास्तुशांती पूजा केली ज्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali New Home Prajktkunj

जुलै महिन्यामध्ये तिने एक पोस्ट शेयर करून कर्जतमध्ये एक फार्महाऊस ((Prajakta Mali New Home Prajktkunj) खरेदी केल्याचे चाहत्यांना सांगितले होते. आपले ड्रीमहाऊस खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणत तिने आपल्या फार्महाऊसची झलक सोशल मिडियावर दाखवली होती. तिने आपल्या फार्महाऊसला “प्राजक्तकुंज” असं नाव दिलं होतं. प्राजक्ताच्या या फार्महाऊसला अनेक पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये तिने आपल्या फार्महाऊसची वास्तुशांती करून घेतली आहे.

Prajakta Mali New Home Prajktkunj

सोशल मिडियावर शेयर केले फोटो (Prajakta Mali New Home Prajktkunj)

प्राजक्ताने कुटुंबियांसोबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेयर केले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करून लिहिले आहे कि, छान, आता लवकरच लग्नाची बातमी दे तुला खूप खूप शुभेच्छा.

वर्कफ्रंट

प्राजक्ता माळीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती महाराष्ट्राची हास्य जत्राची होस्ट आहे. त्याचबरोबर ती वाय चित्रपटामध्ये देखील दिसली होती. आता हा चित्रपट रविवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता झी टॉकीज वाहिनीवर रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तिची रानबाजार हि वेबसिरीज देखील चांगलीच गाजली होती.

हेही वाचा: थाटात पार पडलं मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच लग्न, पहा लग्नाचे फोटोज

Leave a Comment