Shah Rukh Khan at Vaishno Devi: ‘डंकी’ च्या रिलीजपूर्वी शाहरुख खानने घेतले वैष्णो देवीचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan at Vaishno Devi: शाहरुख खानने 2023 मध्ये दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. वाचा शेवटी शाहरुख खान पुन्हा एकदा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपट रिलीज साठी तयार आहे. चित्रपटाच्या रिलीज अगोदर अभिनेता वेश्नो देवीचे दर्शन करण्यासाठी पोहोचला.

Shah Rukh Khan at Vaishno Devi – वैष्णो देवीचे दर्शन घेतले

Shah Rukh Khan at Vaishno Devi

शाहरुख खानला 12 डिसेंबरच्या दिवशी सकाळी वैष्णो देवी मंदिरात स्पॉट केले गेले. जम्मू-काश्मीरच्या कटरा येथून शाहरुख खानचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खानला त्याच्या बॉडीगार्ड सोबत वैष्णो देवीचे दर्शन करण्यासाठी जाताना पाहू शकता. यादरम्यान शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये अभिनेता ब्लॅक कलरच्या हुडीमध्ये चेहरा झाकलेल्या पाहायला मिळाला.

सोशल मिडियावर शाहरुखचा हा (Shah Rukh Khan at Vaishno Devi) व्हिडीओ वेगाने व्हायरल होता हे. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे कि, शाहरुखवर माता राणीचा आशीर्वाद आहे. बॉक्स ऑफिसवर एका हिटची आतुरतेने वाट पाहत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे कि किंग खान पुन्हा एकदा आपल्या मॅजिक सर्वांचे मनोरंजन करणार आहे. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय. आणखी एका युजरने लिहिले आहे कि शाहरुख माता राणीवर किती विश्वास करतो, हे पाहून खूप आनंद झाला.

पठाण आणि जवानच्या वेळी देखील गेतले होते दर्शन

Shah Rukh Khan at Vaishno Devi

शाहरुख खानचा पठाण याच वर्षी रिलीज झाला होता. पठाणच्या रिलीजच्या अगोदर अभिनेता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. सप्टेंबरमध्ये शाहरुख खानचा जवान चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर देखील शाहरुख खानने माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले होते. आता हे डंकी बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

डंकी रिलीज डेट

शाहरुख खानचा डंकी चित्रपटा 21 डिसेंबर 2023 रोजी चित्रपट गृहांमध्ये रिलीज होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपटामध्ये तापसी पन्नू, विक्की कौशल आणि बोमन ईरानी देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Also Read: विद्युत जामवालनं वाढदिवशी न्यूड होऊन लुटला निसर्गाचा आनंद, म्हणाला; ‘मी 7 ते 10 दिवस…’

Leave a Comment