Vidyut Jammwal Nude Photoshoot: विद्युत जामवालनं वाढदिवशी न्यूड होऊन लुटला निसर्गाचा आनंद, म्हणाला; ‘मी 7 ते 10 दिवस…’

Vidyut Jammwal Nude Photoshoot: बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. एकीकडे जिथे चाहत्यांसोबत बॉलीवूड कलाकार देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, तर दुसरीकडे तो एकटाच हिमालयात आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने आपले लेटेस्ट फोटो शेयर करून सर्वांनाच चकित केले आहे. तो सध्या जंगलामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. जंगलामध्ये जेवण बनवण्यापासून ते नदीमध्ये अंघोळ करण्यापर्यंत तो पर्वतांचा कुशीमध्ये एकदम साधे जीवन जगत आहे. त्याच्या प्रवासामध्ये ते सर्वकाही आहे जे एक साहसी व्यक्तीच्या स्वप्नामध्ये असते. त्याने सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे कारण तो हे सर्व कपडे न घालताच करत आहे.

Vidyut Jammwal Nude Photoshoot – विद्युतने शेयर केले फोटो

आपल्या सोशल मिडिया हँडलवरून पोस्ट शेयर(Vidyut Jammwal Nude Photoshoot) करत विद्युतने खुलासा केला आहे कि तो त्याचा वाढदिवस एकट्यानेच आणि फ्रीमध्ये साजरा करत आहे. त्याने म्हंटले कि हे 14 वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याचा एक अनोखा वार्षिक उपक्रम आहे. हिमालय पर्वतांमध्ये माझे पुनरागमन- परमात्माचे निवास्थान 14 वर्षांपूर्वी सुरु झाले होते. प्रत्येक वर्षी 7 ते 10 दिवस एकट्याने जीवन जगणे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

Vidyut Jammwal Nude Photoshoot

विद्युतने पुढे लिहिले, ‘आरामाच्या आणि प्रशंसेच्या जीवनातून जंगलामध्ये येऊन मला माझा एकांत शोधायला आणि मी कोण नाही हे जाणून घेणे आवडते. मी कोण आहे जाणून घेण्यासोबत स्वतःसाठी संघर्ष करण्याचे पहिले पाउल आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात जास्त आरामदायक आहे आणि नैसर्गिक वातावरणासोबत ताळमेळ ठेवतो आणि स्वतःला सॅटेलाइट डिश अँटेना म्हणून कल्पना करतो, जे आनंद आणि प्रेमाची स्पंदने प्रसारित करतो.

तो पुढे म्हणाला कि हि तीच जागा आहे जिथे मी ती उर्जा निर्माण करतो ज्यासोबत मी स्वतःला घेरून घरी परत येऊ इच्छितो. मी माझ्या आयुष्यामध्ये एका नवीन अध्यायाचा अनुभव करण्यासाठी तयार आहे, हा एक पुनर्जन्म आहे. हे देखील शेयर करणे पसंद करेन कि हा एकांत मनासाठी अकल्पनीय आहे. (Vidyut Jammwal Nude Photoshoot)अभिनेत्याने नोटचे समापन एक विशेष घोषणा करून केले. त्याने म्हंटले कि, मी आता पुढचा अध्याय ‘क्रॅक’ साठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यसाठी पूर्णपणे तयार आणि उत्साहित आहे.

Vidyut Jammwal Nude Photoshoot

‘क्रॅक’ दिग्दर्शन आदित्य दत्तने केले आहे, त्याने 2005 मध्ये हिमेश रेशमिया अभिनित रोमँटिक थ्रिलर ‘आशिक बनाया आपने’ दिग्दर्शित केला होता. 2019 च्या एक्शन थ्रिलर, ‘कमांडो 3’ नंतर विद्युतसोबतचा हा आदित्यचा दुसरा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीमने याआधी माहिती दिली होती कि विद्युत चित्रपटामध्ये विविध स्पोर्ट्स स्टंट आणि अॅक्शन सीन स्वत: करताना पाहायला मिळणार आहे.

Also Read: अभिनेता कुणाल ठाकूरसोबत विवाहबंधनात अडकली मुक्ती मोहन, सोशल मिडियावर फोटोज व्हायरल

Leave a Comment