टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड, मराठी अभिनेत्याची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, व्हिडीओ व्हायरल

Shiv Thakare Begging on Street: बिग बॉस मराठी 2 चा विजेता अभिनेता शिव ठाकरे सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बॉस 16, खतरों के खिलाडी अशा शोजमधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. शोमधील शिवच्या डान्सिंग टॅलेंटचे खूप कौतुक झाले. दरम्यान शिवने असा एक व्हिडीओ शेयर केला आहे जो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि शिव आपला एक भयानक लुक मेकअप करतो आणि रस्त्यावर भिक मागू लागतो.

Shiv Thakare Begging on Street

Shiv Thakare च्या व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि शिवला पाहून अनेक लोक घाबरत आहेत. काही लोक तर त्याला पाहून दूर जातात. तर एक महिला ऑटोमध्ये बसलेली पाहायला मिळते, ती ओरडत दुसऱ्या बाजूला जाते. शेवटी एक ऑटोवाला शिवला पैसे देखील देतो. विशेषमध्ये भिकारीच्या वेशामध्ये अभिनेता शिव ठाकरे आहे हे कोणालाच माहिती होत नाही.

रिक्षावाल्यानं जिंकली मनं

शिवच्या या व्हिडीओवर सेलेब्ससोबत चाहत्यांनी देखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवला पाहून काही लोक हैराण झाले आहेत तर काही लोकांना त्याने केलेल्या प्रँकवर हसू येत आहे. तर अनेक लोक रिक्षावाल्याचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, रिक्षावाल्या काकांनी मन जिंकले. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि, मराठी माणसाचं मन खूप मोठं असतं. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, मराठी मानून नेहमी मदतीला धावून येतो.

झलक दिखला जा वर भडकले चाहते

शोमध्ये शिवच्या डांसचे फारसे कौतुक होत नसल्यामुळे त्याचे चाहते सोशल मिडियावर झलक दिखला जा विरुद्ध विरोध करत आहेत. त्यांचा आरोप आहे कि शो चे मेकर्स शिवचा प्रोमो शेयर करत नाही आणि शोएब इब्राहिम चे दोन प्रोमो शेयर करतात. त्यांचा हा देखील दावा आहे कि शोमध्ये जज नेहमी शोएबचे कौतुक करतात, पण शिवच्या मेहनतीबद्दल काहीही बोलत नाहीत. शिवच्या चाहत्यांना शो बायकॉट करण्याची देखील मागणी केली आहे.

हेही वाचा: चेहरा झाकून अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पोहचला दिग्गज अभिनेता, प्रभू श्री रामाने ओळखले अन्…