रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी होंडा घेऊन येत आहे 350cc ची नवीन बाईक, लाँचिंगच्या अगोदर फोटो लीक

Honda 350cc Scrambler: टू-व्हीलर उत्पादक कंपनी होंडा लवकरच 350cc Scrambler लाँच करण्याची तयारी करत आहे. आता लाँचिंगच्या अगोदर अपकमिंग स्क्रॅम्बलरचा फोटो ऑनलाईन लीक झाला आहे. या पेटंटवरून बाईकचे डिझाईन आणि फीचर्सची बरीच माहिती समोर आली आहे. होंडा 350cc स्क्रॅम्बलरमध्ये रुंद हँडलबार, राउंड हेडलॅम्प्स, समोर आणि मागील बाजूस समान आकाराचे अलॉय व्हील्स, फोर्क गेटर्स, फ्यूल टँकवर मेटल फ्रेम आणि एक अपस्वेप्ट एग्जॉस्ट दिला गेला आहे. चला तर जाणून घेऊया या अपकमिंग बाईकबद्दल.

Honda 350cc Scrambler Features

होंडा 350cc स्क्रॅम्बलरचा रायडींग स्टॅन्स आरामदायक आहे. बकेट रायडर सीटसह सीटची उंची 800 मिमी पेक्षा कमी असू शकते. सस्पेंशन सेटअपमध्ये फ्रंट साईडला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक एब्जॉर्बर सामील आहेत. स्क्रॅम्बलर आणि एडीवी दोन्ही मॉडेल्समध्ये सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअप सामान्य असू शकतो. तर होंडा CB350 एक ऑल-एलईडी सेटअप आहे जो 350cc स्क्रॅम्बलर बाईकमध्ये देखील असू शकतो.

Honda 350cc Scrambler

Honda 350cc Scrambler Engine

दुसरीकडे अपकमिंग होंडा 350cc स्क्रॅम्बलर 348.36cc इंजिनने सुसज्ज असू शकते, जी 21PS कमाल पॉवर आणि 30Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले आहे. होंडा इंजिन ट्यूनिंग जसेच्या तसे ठेऊ शकते. तर हिंद सध्याच्या CB35 मधून कंपोनेंट्स मधून उधार घेण्याच्या प्रयत्न करेल.

या बाईकसोबत होणार स्पर्धा

मार्केटमध्ये अपकमिंग होंडा 350cc स्क्रॅम्बलरची स्पर्धा येज्दी स्क्रॅम्बलर, रॉयल एनफील्ड स्क्रॅम आणि ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X सोबत होईल. अपकमिंग बाईक 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ओलाची बत्ती गुल! हि ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये देतेय 500 किमी रेंज, फक्त 499 मध्ये करा बुक