Shreyas Talpade Health Update: बॉबी देओलने शेयर केली श्रेयस तळपदेच्या प्रकृती विषयी मोठी अपडेट, म्हणाला; ‘त्याचे हृदय 10 मिनिटे बंद पडले होते आणि..’

Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्यानंतर सिनेजगतामध्ये याबद्दल सध्या मोठी चर्चा होत आहे. नुकतेच बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने श्रेयस तळपदेच्या प्रकृती विषयी मोठी अपडेट शेयर केली आहे. श्रेयस तळपदेचा मित्र आणि अ‍ॅनिमल स्टार बॉबी देओलने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बातमी शेयर केली आहे.

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बॉबी देओल म्हणाला कि, श्रेयस बद्दल धक्कादायक बातमी (Shreyas Talpade Health Update) मिळाल्यानंतर मी त्याची पत्नी दीप्ती तळपदेसोबत बोललो, ती खरंच खूप अस्वस्थ होती, बॉबी देओल पुढे म्हणाला कि, त्याचे हृदय 10 मिनिटांसाठी बंद पडले होते. पण आम्ही त्याला परत मिळवले आहे, त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी केली गेली, तो आता पूर्णपणे बरा व्हावा हीच प्रार्थना.

Shreyas Talpade Health Update

गुरुवारी रात्री श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात नेले होते. वाटेमध्येच तो बेशुद्ध झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार तो दिवसभर खूप उत्साही होता, सेटवर त्याने मजा-मस्ती देखील केली, शुटींग संपवून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले ज्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

श्रेयस तळपदे हेल्थ अपडेट (Shreyas Talpade Health Update)

शुक्रवारी श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून सांगितले आहे कि श्रेयस आता ठीक आहे, त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. माझ्या पतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते. मेडिकल टीमची वेळेवर मदत आणि वेळेवर प्रतिसाद खूपच महत्वाचा ठरला. मी आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते.

वर्कफ्रंट

Shreyas Talpade Health Update

श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. तर वेलकम टू जंगलबद्दल चित्रपटामध्ये तो अक्षय कुमार-श्रेयस तळपदे यांच्यासोबत रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव यांच्यासोबत प्रमुख भूमिकेमध्ये आहे.

Leave a Comment