अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, मुंबईतल्या रुग्णालयात तातडीने.. (Shreyas Talpade suffers heart attack)

Shreyas Talpade suffers heart attack: अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयस 47 वर्षांचा आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत तो वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शुटींग संपल्यानंतर तो बेशुध्द पडला. श्रेयसला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shreyas Talpade suffers heart attack

श्रेयसची प्रकृती बिघडली – Shreyas Talpade suffers heart attack

गेल्या दिवशी नुकतेच अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेयर केला होता, ज्यामध्ये ते वेलकम टू द जंगल चित्रपटाचे शुटींग करताना दिसत होते. स्टंट परफॉर्म करत असलेल्या अक्षयच्या पाठीमागे श्रेयस शिडीवर उभा होता. व्हिडीओमध्ये अभिनेते मस्ती करताना स्पष्ट दिसत आहेत. पण कोणालाच अंदाज नव्हता कि असे काही होईल. असे सांगितले जात आहे कि श्रेयस शुटींग पूर्ण केल्यानंतर खाली कोसळला. (Shreyas Talpade suffers heart attack) अभिनेत्याला अंधेरी वेस्ट येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले.

एक्शन सिक्वेन्स केला शूट

रुग्णालयातील प्रशासनाने कन्फर्म केले कि रात्री 10 वाजता त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. अभिनेत्याच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. माहितीनुसार श्रेयार दिवसभर शुटींग करत होता आणि तो पूर्णपणे ठीक होता. तो सेटवर सर्वांसोबत मस्ती करत होता. त्याने थोडा एक्शन सिक्वेन्स देखील शूट केला. शूट पूर्ण झाल्यानंतर तो घरी गेला आणि तो पत्नीला म्हणाला कि त्याला बरे वाटत नाही. (Shreyas Talpade suffers heart attack) पत्नी दीप्ती तळपदेने घाईघाईने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले पण त्यापूर्वीच तो बेशुद्ध झाला होता. सध्या तो रुग्णालयातच दाखल आहे.

Shreyas Talpade suffers heart attack

श्रेयस अनेक मोठ्या हिन्दी चित्रपटांचा भाग आहे. तो मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला अभिनेता आहे. इकबाल, ओम शांति ओम, गोलमाल रिटर्न्स, हाउसफुल 2 सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अभिनेता लवकरच कंगना रनौतसोबत ईमरजेंसी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. वेलकम टू जंगलबद्दल बोलायचे तर हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार-श्रेयस तळपदे यांच्यासोबत रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर गायक बंधू दलेर मेहंदी आणि मिका सिंह देखील आहेत. चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

Leave a Comment