Tilak Mehta Success Story: शाळेत जाण्याच्या वयामध्ये सुरु केला व्यवसाय, 17 व्या वर्षी बनला 100 करोडच्या कंपनीचा मालक

Tilak Mehta Success Story: ज्या वयामध्ये मुले शाळेत जातात त्या वयामध्ये एका मुलाने आपल्या मेहनतीच्या बळावर 100 करोडची कंपनी उभी केली आहे. या गोष्टीवर लोकांना विश्वासच बसत नाही. पण मुंबईत राहणाऱ्या तिलक Tilak Mehta ने असे करून दाखवले आहे. तिलकने लहान वयामध्येच मोठा आदर्श घालून दिला आहे. तिलक मेहताने अभ्यासासोबत व्यवसाय देखील सुरु ठेवला आणि 2 वर्षामध्येच एक यशस्वी उद्योजक बनला.

शाळेत जाण्याच्या वयामध्ये तिलकने 200 पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. तिलक मेहता (Tilak Mehta) चा जन्म 2006 मध्ये गुजरातमध्ये 17 वर्षापूर्वी झाली होता. तिलक मेहताचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीमध्ये काम करतात. तिलक मेहताची आई काजल मेहता गृहिणी आहे, तिलकला एक बहिण देखील आहे. चला तर जाणून घेऊया तिलक मेहताने कशाप्रकारे यश मिळवले आहे.

Tilak Mehta ने अशी केली सुरुवात

लहानपणीच्या एका घटनेने तिलक मेहता (Tilak Mehta) ला बिजनेसची कल्पना सुचली. वास्तविक ऑफिसमधून परततल्यानंतर जेव्हा देखील तिलक आपल्या वडिलांना स्टेशनरीमधून सामान आणण्यासाठी सांगायचा तेव्हा प्रचंड थकव्यामुळे त्याचे वडील नकार देत असत. अशामध्ये तिलकला पुस्तकांची होम डिलिव्हरी करण्याची कल्पना सुचली. त्याने आपल्या वडिलांना बिजनेस प्लान सांगितला. तिलकने कुरियर सर्विस सुरु करण्याचा संपूर्ण प्लान तयार केला. वडिलांनी त्याला सुरुवातीचा फंड दिला, त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारेख यांच्यासोबत करून दिली, ज्यांनी तिलकच्या बिजनेसमध्ये गुंतवणूक केली. तिलकची कल्पना ऐकून त्यांनी बँकेची नोकरी सोडून बिजनेस जॉईन केला. दोघांनी मिळून पेपर एन पार्सल नावाची कुरियर सर्व्हिस सुरु केली.

Tilak Mehta

काय करते कंपनी

2006 मध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल (Paper N Parcels) चा फाउंडर आहे. पेपर एन पार्सल एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे शिपिंग आणि लॉजिस्टिक सेवा प्रदान करते. कंपनीकडे यासाठी मोठी टीम आहे. हि कंपनी मोबाईल ऐपद्वारे लोकांना डोरस्टेप सर्व्हिस देते. कंपनीसोबत 200 कर्मचारी आणि 300 पेक्षा जास्त डबेवाले जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांद्वारे कंपनी दररोज हजारो लोकांना पार्सल डिलिव्हरी करते आणि यासाठी जवळ जवळ 40 ते 180 रुपये पर्यंत चार्ज करते.

Also Read

==> इंजिनीअरिंगची नोकरी सोडून गोळा केले भंगार, वर्षाला 10 कोटींची उलाढाल, 300 लोकांना दिला रोजगार

Leave a Comment