‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री सोनारिका भदौरियाचा विवाहसोहळा थाटात संपन्न, लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Sonarika Bhadoria Wedding: देवों के देव महादेव सिरीयलमध्ये पार्वतीची भूमिका करून फेमस झालेली अभिनेत्री सोनारिका भदौरियाने नवीन आयुष्यामध्ये पाऊल ठेवले आहे. ती विवाहबंधनात अडकली आहे. सोनारिकाने रविवारी तिचा बॉयफ्रेंड विकास पाराशर सोबत सात फेरे घेतले. सोशल मिडियावर तिच्या लग्नाची पहिली झलक समोर आली आहे. तिच्या वरमालाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोनारिकाने राजस्थानमध्ये शाही थाटामध्ये लग्न (Sonarika Bhadoria Wedding) केले आहे.

Sonarika Bhadoria Wedding

कसा होता सोनारिकाचा लुक?

सोनारिकाने आपल्या लग्नात फिशकट स्टाइलचा लेहेंगा परिधान केला होता. लग्नसाठी तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या लुकला तिने डायमंड ज्वेलरीने पूर्ण केले होते. त्याचबरोबर केसांमध्ये गजरा देखील घातला होता. सोनारिकाच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने खूपच कमी मेकअप केला होता. सोनारिका या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या लुकला चाहते देखील खूप पसंद करत आहेत.

वरमालाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मिडियावर सोनारिकाच्या लग्नाचा (Sonarika Bhadoria Wedding) व्हिडीओ समोर आला आहे. एका व्हिडीओमध्ये सोनारिका वरमाला घेऊन एन्ट्री घेताना दिसत आहे. तिने घूंघट घेऊन एंट्री घेतली. दुसऱ्या व्हिडीओमध्ये सोनारिका आणि विकास एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. या दरम्यान सोनारिका खूपच खुश दिसत होती. बॅकगाउंडमध्ये राम सिया राम गाणे वाजत आहे.

सोनारिकाच्या वेडिंग फंक्शन्स बद्दल बोलायचे झाले तर तिने मेहंदीमध्ये तिच्या आईचा पोशाख परिधान केला होता. या पोशाखामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर विकास देखील कलर कोऑर्डिनेटेड आउटफिट मध्ये दिसला. सोनारिका ने आपल्या हातामध्ये खूपच खास मेहंदी काढली होती. तिने हातामध्ये शिव-पार्वती काढले होते. तर हळदीसाठी सोनारिकाने येलो कलरच्या ड्रेस कॅरी केला होता. तिने फ्लोवर ज्वेलरीने आपला लुक पूर्ण केला होता.

News Title: sonarika bhadoria wedding video and photos