Ola S1 Air Price Drop: ओला इलेक्ट्रिकने नुकतेच घोषणा केली आहे कि आपल्या टॉप 3 इलेक्ट्रिक स्कूटर मॉडलवर जवळजवळ 25000 चा डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट फक्त काहीच दिवस राहिला आहे. जर तुम्ही एखादी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ओलाची हि इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.
ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या या Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरवर जवळ जवळ 30000 चा डिस्काउंट देत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला जबरदस्त वेग आणि 3kWh क्षमतेची बॅटरी पाहायला मिळते, यासोबतच तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काही स्मार्ट फीचर्स देखील पाहायला मिळतात. चला तर जाणून घेऊया हि ऑफर कधीपर्यंत व्हॅलिड आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती झाली आहे.
3 kWh क्षमतेची बॅटरी
जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला जवळ जवळ 3kWh क्षमता वाली लिथियम बॅटरी पाहायला मिळते, जी या इलेक्ट्रिक स्कूटरला 151 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. लोकांच्या रिव्यू नुसार याची रेंज खूप चांगली आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 6 तास वेळ लागतो.
90 किलोमीटर प्रति तास वेग
हि इलेक्ट्रिक स्कूटर खूपच जास्त फास्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ओलाने आतापर्यंत कोणतीही कमी स्पीडची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली नाही. Ola S1 Air मध्ये तुम्हाला 4.5 kW वाली पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर पाहायला मिळते. जी या इलेक्ट्रिक स्कूटर ला 90 किलोमीटर प्रति तास वेग देण्यास सक्षम आहे.
जबरदस्त फीचर्स
जसे कि आम्ही तुम्हाला सांगितले आहे कि हि इलेक्ट्रिक स्कूटर खूपच कमी किंमतीमध्ये मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये जे जबरदस्त फीचर्स मिळतात ते इतर कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पाहायला मिळणार नाहीत. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला 7 इंची टच स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिविटी, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, ओला मॅप्स, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, यूएसबी चार्जिंग पोर्ट, साइड स्टँड सेन्सर यासारखे अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.
काय आहे किंमत
सुरुवातीला Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.11 लाख रुपये होती, पण जर तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कूटर फेब्रुवारी महिन्यामध्ये खरेदी केली तर तुम्हाला जवळ जवळ 23000 ते 25000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. आता या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत भारतीय मार्केटमध्ये 84,634 रुपये आहे.
News Title: ola s1 air price drop 25000
हेही वाचा: Honda Activa 6G खरेदी करणे आता झाले आणखी सोपे…! फक्त 30, 000 मध्ये घरी आणा, जाणून घ्या कसे?