KGF स्टार यशच्या साधेपणाने जिंकली मनं; बायकोसाठी केली ‘ही’ खास गोष्ट, फोटोज व्हायरल

KGF Star Yash Buys Ice Candy for Wife: साऊथ स्टार यश नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहतो. अभिनेत्याचे लाखो चाहते आहेत जे त्याच्यावर खूप प्रेम करतात. यश आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकतो. आता अभिनेत्यांच्या एका जेस्चरने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सध्या सोशल मिडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

लोकल दुकानामधून खरेदी केली बायकोसाठी कँडी

सोशल मिडियावर व्हायटल होत असलेल्या फोटोमध्ये यश (KGF Star Yash) एका लोकल स्ट्रीट दुकानावर त्याची बायको राधिकासाठी आईस कँडी खरेदी करताना दिसत आहे. यश नुकतेच चित्रापूर मठात पोहोचला होता. यादरम्यान त्याची बायको राधिका पंडित देखील त्याच्यासोबत होती. यादरम्यान अभिनेत्याने आपल्या पत्नीला स्पेशल फील कार्नाय्साठी तिच्यासाठी तिची आवडती कँडी खरेदी केली. अभिनेत्याने एका लोकल शॉपमधून राधिकासाठी तिची आवडती कँडी खरेदी केली.

चाहत्यांनी शेयर केले यशचे फोटो

यादरम्यान यशच्या (KGF Star Yash) एका चाहत्याने त्याला कॅप्चर केले आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले. एका फोटोमध्ये यश दुकानाच्या बाहेर उभा आहे आणि तिथेच एका बाजूला स्टूलवर त्याची बायको बसलेली दिसत आहे. यशचा इतक साधेपणा पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. चाहत्यांना यशचा हा अंदाज खूपच आवडला आहे.

राधिकाने व्हॅलेंटाइन डेचे खास फोटो शेयर केले

नुकतेच यशने त्याची बायको राधिका सोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. यादरम्यान त्याची मुले आयरा आणि यथर्व देखील पाहायला मिळाले. अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब बाहेर फिरायला गेले होते. राधिकाने आपल्या व्हॅलेंटाइन लंचच्या काही झलक देखील दाखवल्या. यासोबत तिने कॅप्शनमध्ये ‘माय व्हॅलेंटाइन डे लंच विथ माय फॉरेव्हर व्हॅलेंटाइन’ असे लिहिले होते.

KGF Star Yash Buys Ice Candy for Wife

यश वर्कफ्रंट

यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो प्रशांत नीलच्या केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत संजय दत्त, रवीना टंडन, अनुष्का शेट्टी, प्रकाश राज सारखे स्टार पाहायला मिळाले होते. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाने जगभरामध्ये चांगला बिजनेस केला होता. चित्रपट सुपरहिट ठरला होता.

News Title: kgf star yash buys ice candy for wife

हेही वाचा: रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात दाखल, व्हिडीओ व्हायरल