गौतमी देशपांडेचंही ठरलं, ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार विवाहबंधनात, मेहेंदीचे फोटो व्हायरल

Gautami Deshpande Wedding: मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. सुरुची आडारकर आणि पियुष रानडे नंतर अभिनेता ध्रुव दातार तर गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायण असे सेलेब्रिटी विवाहबंधनात अडकले. तर आता गौतमी देशपांडेच्या घरी देखील लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

इंस्टाग्रामवरून शेयर केली पोस्ट (Gautami Deshpande Wedding)

नुकतेच गौतमी देशपांडेने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करून हि आनंदाची बातमी (Gautami Deshpande Wedding) चाहत्यांसोबत शेयर केली आहे. गौतमीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव स्वानंद तेंडूलकर आहे. गौतमी आणि स्वानंद अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

गौतमी आणि स्वानंद अनेकवेळा एकत्र पाहायला मिळाले आहेत. दोघांनी देशपांडे यांच्या कौटुंबिक लग्नामध्ये देखील हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यानचे त्यांचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान दोघे एकमेकांना डेट करत असल्याची देखील चर्चा रंगली होती.

Gautami Deshpande Wedding

सई ताम्हणकरची खास कमेंट

सई ताम्हणकरने देखील त्यांच्या फोटोवर एक खास कमेंट करून याची पुष्टी दिली होती. दरम्यान आता दोघांचे प्रेम जगजाहीर आहे आणि लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. एक खास फोटोशूट करून दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यांच्या या गोड बातमीवर सध्या चाहते आणि सेलेब्रिटी कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

Gautami Deshpande Wedding

गौतमी देशपांडे हि सध्या गालिब या नाटकामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. सारे तुझ्याचसाठी आणि माझा होशील ना या सिरियल्समध्ये देखील तिने काम केले आहे. तर स्वानंद तेंदुल हा अभिनेता आणि त्याचबरोबर डिजिटल क्रियेटर आहे. भाडीपा या डिजिटल मिडियाचा तो व्हॉइस प्रेसिडेंट आहे. एकाच इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि आता लवकरच दोघे लग्न करणार आहेत. ‘गेटिंग मॅरीड’ असे म्हणत गौतमीने या लग्नाची बातमी दिली आहे.

हेही वाचा:  मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Leave a Comment