Trident Techlabs IPO : Trident Techlabs च्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा इश्यू आतापर्यंत 121.07 टक्के सब्सक्राईब झाला आहे. आतापर्यंत याला एकूण 36.51 करोड शेयर्सची बोली मिळाली आहे तर 30.16 लाख शेअर्स ऑफरवर आहेत. हा IPO 21 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे आणि 26 डिसेंबर रोजी बंद होईल. ट्रायडेंट टेकलॅब्सचा IPO हा 16.03 करोडचा बुक बिल्ट इश्यू आहे. या IPO अंतर्गत 45.8 लाख फ्रेश इक्विटी शेअर जारी करण्यात आले आहेत.
विविध कॅटेगरीची स्थिती (Trident Techlabs IPO)
22 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, हा IPO 121.07 टक्के सबस्क्राईब झाला आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये या इश्यूला 204.78 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्सचा हिस्सा 3.07 टक्के भरला आहे. त्याचबरोबर, एनआयआय NII कॅटेगरीमध्ये 68.83 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. 25 डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट बंद होते.
या IPO साठी 33-35 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. सबस्क्रिप्शननंतर, यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप 27 डिसेंबर रोजी होईल. त्याच वेळी, त्याची लिस्टिंग 29 डिसेंबर रोजी NSE SME वर होईल. अर्जासाठी किमान लॉट साईज 4000 शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1,40,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
GYR Capital Advisors Pvt Ltd ट्रायडेंट टेकलॅब्स IPO चे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर मशितला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. Trident Techlabs IPO साठी मार्केट मेकर गिरिराज स्टॉक ब्रोकिंग आहे.