Tripti Dimri Photos: रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना मुख्य हिरोईन असली तर तिच्यापेक्षा जास्त पॉपुलर झाली अबिनेत्री तृप्ति डिमरी. बॉलीवूड असो किंवा सोशल मिडिया प्रत्येक ठिकाणी भाभी 2 म्हणजेच तृप्ति डिमरीच्याचा चर्चा आहेत. चित्रपटामध्ये फक्त काहीच वेळ दिसलेली अभिनेत्री तृप्ति डिमरी दर्शकांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली. चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले. आता पुन्हा एकदा तृप्तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ओव्हरसाईज ब्लेझर लुकमध्ये तृप्तिचा स्टनिंग अवतार पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
तृप्ति डिमरीने शेयर केले फोटो
नुकतेच अभिनेत्री तृप्ति डिमरीने आपल्या अधिकृत इंस्टा हँडलवरून तिचे काही फोटो (Tripti Dimri Photos) शेयर केले आहेत. या फोटोंवरून नजर हटवण्याचे मनच करत नाही. फोटोंमध्ये तृप्तिने ओव्हरसाईज ब्लेझरला व्हाईट बॉटम सोबत पेयर केले आहे. ज्यामध्ये तिचा लुक खूपच स्टनिंग दिसत आहे.
डीप नेक ओव्हरसाईज ब्लेझरमध्ये तृप्तिला पाहून चाहत्यांचे होस उडाले आहेत. बेधडक आणि ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळत असलेल्या तृप्तिच्या या अंदाजावर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. हेयर, मिनिमल मेकअप आणि जबरदस्त पोजमध्ये तृप्ति खूपच सुंदर दिसत आहे.
नॅशनल क्रश बनली आहे तृप्ति डिमरी
सोशल मिडियावर तृप्ति डिमरीचा हा लुक (Tripti Dimri Photos) खूपच व्हायरल होत आहे आणि लोक तिचे भरभरून कौतुक करत आहेत. एका चाहत्याने तर तृप्तिची तुलना हॉलीवूड अभिनेत्री एमी जॅक्सनसोबत केली आहे. त्याने लिहिले आहे कि, 5 मिनीट हे सामन्यात गेले कि हि तृप्ति आहे कि एमी जॅक्सन. एनिमल चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेत्रीला साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून देखील ऑफर येऊ लागल्या आहेत. असे म्हंटले जात आहे कि अभिनेत्री तृप्ति डिमरी तेलगु चित्रपटामध्ये काम करणार आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये ती विजय देवराकोंडा सोबत दिसणार आहे.
News Title: tripti dimri oversized coat photos
हेही वाचा: ‘अॅनिमल’ मधील ‘भाभी-2’ तृप्ति डिमरीचा जबरदस्त डांस, पाहून चाहत्यांना सुटला ताबा