अधिपती मास्तरीणबाईंना काढणार घराबाहेर! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सिरीयलमध्ये येणार मोठा ट्विस्ट | Tula Shikvin Changlach Dhada

Tula Shikvin Changlach Dhada: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि सिरीयल सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला दर्शकांकडून अल्पावधीमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला. सध्या सिरीयलमध्ये अक्षराला भुवनेश्वरीच्या भूतकाळातील सत्य समजल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळतो आहे. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये काय काय घडणार याची उत्सुकता आता दर्शकांना लागली आहे.

अधिपतीसोबत लग्न झाल्यानंतर अक्षर तिचे सासरे चारुहास यांची वाचा परत आणण्याचा प्रयत्न करते. अखेर तिचे प्रयत्न यशस्वी ठरतात. अक्षरा देवीला प्रार्थना करत असताना ती सुनेला तथास्तु म्हणते. सासरे बरे झालेले पाहून अक्षर खूपच आनंदी होते हे गेल्या भागांमध्ये पाहायला मिळालं आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) सिरीयलमध्ये पुढे, चारुहास सुनेला भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नसल्याचं सत्य सांगतो. सासऱ्यांच्या या खुलास्यानंतर अक्षराला धक्का बसतो. चारुहासच्या पत्नीचं व अधिपतीच्या खऱ्या आईचं नाव चारुलता असं असतं. भुवनेश्वरी केवळ पैशांसाठी सूर्यवंशींचं घर उद्धवस्थ करते. त्यामुळे या संकटांतून अधिपतीला फक्त अक्षराच लवकरात लवकरत बाहेर काढू शकते असा विश्वास चारुहासला असतो.

एकीकडे, अक्षरासमोर भुवनेश्वरीचं पितळ उघड पडत. तर, दुसरीकडे आजारपणाचं खोटं नाटक करून भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या जाळ्यात ओढते. चारुहासकडून सत्य ऐकल्यावर अक्षरा नवऱ्यासमोर भुवनेश्वरीचं भांडं फोडण्याचा प्रयत्न करते. परंतु, याचा काहीच उपयोग होत नाही. अधिपती त्याच्या खोट्या आईच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.

Tula Shikvin Changlach Dhada Promo

अक्षरा सगळ्या सुर्यवंशी कुटुंबासमोर भुवनेश्वरीला “तुमचं काम फक्त अधिपतीला सांभाळणं एवढंच होतं. पण, तुम्ही या घरात पाय रोवून सगळं बळकावलं” असं खडसावून सांगते. यावर भुवनेश्वरी अधिपतीला सांगते, “ही काल आलेली पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते. याला काय अर्थ आहे? आता ना तुम्हाला आमची गरज आहे… ना या घराला.” आईचं बोलणं ऐकून अधिपती संतापतो अन् रागाच्या भरात हात धरून अक्षराला घराच्या बाहेर काढतो. हा विशेष भाग प्रेक्षकांना 17 जानेवारी रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अधिपती खरंच अक्षराला घराबाहेर काढणार का? अधिपती-अक्षराच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यात भुवनेश्वरीला यश येईल का? हे मालिकेत लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीचं ‘बोल्ड फोटोशूट’, सोशल मिडियावर फोटो व्हायरल, पहा फोटोज