UPI Payment New Rule: जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर, तुम्हाला आजपासून मोठा फायदा मिळणार आहे. कारण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने RBI च्या मंजुरीनंतर UPI पेमेंट मर्यादा आता 5 लाख रुपये केली आहे. आता युजर्स एका दिवसामध्ये 5 लाख रुपये यूपीआई पेमेंट करू शकणार आहेत. यूपीआई पेमेंट लिमिट शिथिल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती, जी आजपासून लागू करण्यात आली आहे.
कोणाला मिळणार लाभ?
5 लाख रुपयांच्या यूपीआई पेमेंट लिमिटचा फायदा मेडिकल आणि एजूकेशन सेक्टर मध्ये जास्त मिळणार आहे. जर तुम्ही आजारपणात हॉस्पिटलमध्ये पैसे भरत असाल किंवा कोणत्याही शिक्षणासाठी पैसे भरू इच्छित असाल तर तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये UPI पेमेंट करू शकणार आहात. आत्तापर्यंत हि मर्यादा 1 लाख रुपये होती. याचा अर्थ आता युजर्स एका दिवसांमध्ये 5 लाख रुपये यूपीआई पेमेंट करू शकणार आहेत.
UPI नवीन नियम कधी लागू होणार?
UPI पेमेंट मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा नियम आजपासून म्हणजेच 10 जानेवारी 2024 पासून लागू होत आहे. NPCI ने बँका आणि पेमेंट सेवा प्रोव्हाईडर्स ला एडवाइजरी जरी केली आहे.
फोनपे, गूगल पे ला मिळणार जास्त फायदा
भारतामध्ये UPI पेमेंट मध्ये सातत्याने वाढत आहे. यूपीआई पेमेंट मर्यादा 5 लाख रुपये झाल्यानंतर याचा फायदा PhonePe, Google Pay, Paytm सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या युजर्सला होणार आहे. भारतामध्ये PhonePe सर्वाधिक वापरले जाते. यानंतर गुगल पे आणि नंतर पेटीएम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा: गुगल पे, फोनपेला टक्कर देण्यासाठी बाजारात येणार TATA Pay, रतन टाटा करणार टाटा पे लाँच