लग्नाच्या तीन वर्षानंतर वरुण धवन होणार बाबा, गरोदर बायकोसह फोटो शेयर करत दिली चाहत्यांना गुड न्यूज

Varun Dhawan-Natasha Dalal Pregnant: बॉलीवूडचा प्रसिद्ध वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. त्याने हि बातमी 18 फेब्रुवारी रोजी शेयर केली आहे. वरुणने त्याची पत्नी नताशा दलाल सोबत एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती आपले बेबी बंप फ्लाँट (Natasha Dalal Pregnant) करताना दिसत आहे. वरुणने शेयर केलेल्या फोटोवर त्याचे चाहते, त्याचे सहकलाकार आणि इतर अनेक बॉलिवूड स्टार्स त्याचे अभिनंदन करत आहेत.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी 2021 मध्ये लग्न केले होते. ते एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. आता फायनली दोघे आई-बाबा होणार आहेत आणि कपल आता खूपच खुश आहे.

Varun Dhawan-Natasha Dalal Pregnant

वरुण धवन आणि नताशा दलाल होणार पॅरेंट्स

वरुण धवनने एक सुंदर फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये तो नताशा दलालाच्या बेबी बंपला (Natasha Dalal Pregnant) कीस करताना दिसत आहे. हा फोटो खूपच सुंदर दिसत आहे आणि याच्या कॅप्शनमध्ये आम्ही प्रेग्नंट आहे आणि आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे असे लिहिले आहे. त्याचबरोबर वरुणने हॅशटॅगमध्ये मेरी फॅमिली मेरी स्ट्रेंथ असे लिहिले आहे.

सेलेब्सने दिल्या शुभेच्छा

वरुण धवनच्या या फोटोवर जान्हवी कपूर आणि सानिया मिर्जाने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अर्जुन कपूरने डॅडी-मम्मी नंबर 1 असे लिहिले आहे. शिवाय सोनम कपूर, भूमी पेडणेकर, अरमान मलिक, मलायका अरोरा, अनिल कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी अभिनंदन करताना हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. कलाकारांशिवाय चाहते देखील वरुण धवनला शुभेच्छा देत आहेत.

वरुण धवन वर्कफ्रंट

वरुण धवनचे ‘भेडिया 2’ आणि ‘बेबी जॉन’ सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत, तर ‘स्त्री 2’ या चित्रपटात तो एक कॅमिओमध्ये देखील झळकणार आहे. नताशा दलालबद्दल बोलायचे तर ती फिल्मी जगापासून दूर राहते आणि तिला क्वचितच लाइमलाइटचा भाग व्हायला आवडते.

News Title: varun dhawan wife natasha dalal pregnant

हेही वाचा: यामी गौतम होणार आई! लग्नाच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळना