रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात दाखल, व्हिडीओ व्हायरल

Jackky Bhagnani – Rakul Preet Singh Wedding: बॉलीवूडमधील फेमस कपल रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारीला हे कपल गोव्यामध्ये विवाहबद्ध होणार आहे. कपलच्या लग्नामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. रकुल आणि जॅकी दोघेही आपल्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. कपल कुटुंबासोबत गोव्याला पोहोचले आहे. विमानतळावरून दोघांचे फोटो समोर आले आहेत. दोघेही वेगवेगळ्या गाडीमध्ये वेन्यु साठी रवाना झाले.

कपलच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. नुकतेच रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh Wedding) आणि जॅकी भगनानी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचले होते. कपलने लग्नाचे पहिले कार्ड देवाच्या चरणी ठेवले होते. कपलच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

Rakul Preet Singh Wedding

गोव्याला पोहोचले रकुल आणि जॅकी

विमानतळावर रकुलप्रीत सिंग कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाली. अभिनेत्री ऑरेंज कलरच्या पँटसूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो स्पष्ट दिसत होता. कपल आपल्या नवीन जीवनाच्या सुरुवातीसाठी खूपच उत्सुक आहे. कपलचे लग्न पूर्णपणे इको फ्रेंडली असणार आहे. कपलने लग्नपत्रिकेच्या ठिकाणी डिजिटल आमंत्रणे पाठवली आहेत.

कपलच्या लग्नामध्ये फटाक्यांची आतिषबाजी होणार नाही. कपलने आपल्या रिलेशनशिपला 2021 मध्ये ऑफिशियल केले होते. रकुल आणि जॅकी एकमेकांचे प्रेम व्यक्त करण्याची एक देखील संधी सोडत नाहीत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रकुल कमल हसनसोबत इंडियन 2 मध्ये दिसणार आहे. दरम्यान, जॅकी त्याच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

News Title: jackky bhagnani rakul preet singh wedding

हेही वाचा: राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका व्हायरल