Vikrant Massey Become Father: 12 वी फेल अभिनेता विक्रांत मेसी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. विक्रांत त्याच्या चित्रपटाच्या याशाबद्ल आनंदी आहेच त्याचबरोबर आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांचा गुड न्यूज आहे. विक्रांत लग्नाच्या दोन वर्षानंतर बाबा बनला आहे. (Vikrant Massey Become Father) त्याची पत्नी शीतल ठाकूरने आला जन्म दिला आहे.
विक्रांत मेसी बनला बाबा
विक्रांत मेसी आणि शीतल ठाकूरने आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागताची बातमी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेयर केली आहे. (Vikrant Massey Become Father) या पोस्टमध्ये आजची तारीख लिहिली आहे. तर पोस्टरमध्ये रीवील केले आहे कि कपलला एक गोड मुलगा झाला आहे.
पॅरेंट्स बनल्याबदल सेलेब्स देत आहेत शुभेच्छा
विक्रांतच्या या पोस्टनंतर आता प्रत्येकजण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. पोस्टवर राशी खन्नाने कमेंट करून मेसीचे अभिनंदन लिहिले आहे. तर आरजे किसना यांनी खूप खूप अभिनंदन असे लिहिले आहे. शिवाय टीव्ही अभिनेत्री सुरभि ज्योति Congratulations Guysss लिहून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री शोबिता दास, मनीष मल्होत्रा अशीत इतर अनेक सेलेब्सने कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नाच्या 2 वर्षानंतर पॅरेंट्स बनले कपल
विक्रांत मेसीने 14 फेब्रुवारी 2022 रोजी शीतल ठाकूरसोबत लग्न केले होते. कपलने पहाडी रितीरिवाजाने लग्न केले होते. विक्रांतने आपल्या लग्नाला खूपच इंटीमेट ठेवले होते. तथापि लग्नाच्या फंक्शन पासून लग्नापर्यंत अनेक फोटो सोशल मिडियावर समोर आले होते. फोटोमध्ये विक्रांत आणि शीतल खूपच क्युट दिसत होते. या 14 फेब्रुवारीला कपलच्या लग्नाला दोन वर्षे होणार आहे आणि याआधी विक्रांत आणि शीतलने आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. (Vikrant Massey Become Father)
12वीं फेल साठी विक्रांतला मिळाला क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर नुकतेच विक्रांत मेसी 12 वी फेल चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट दर्शकांना खूपच आवडला. कमी बजटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या सर्वत्र चर्चा होत आहेत. चित्रपटामध्ये विक्रांतच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. 12वी फेल चित्रपटाला फिल्मफेयर मध्ये बेस्ट फिल्मचा अवॉर्ड दिला गेला. तर चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्राला बेस्ट डायरेक्टर चा अवॉर्ड मिळाला. शिवाय विक्रांत मेसीला या चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला.