श्रेया बुगडेने सुरु केलं स्वतःच रेस्टॉरंट, दिलं हटके नाव, पहा कसं आहे आकर्षक इंटिरिअर

Shreya Bugde Starts New Restaurant: श्रेय बुगडे मराठी मनोरंजन क्षेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून तिला घराघरामध्ये ओळख मिळाली आहे. आपल्या अभिनयाच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री आता अभिनयासोबत व्यवसायामध्ये देखील उतरली आहे. श्रेयाने हॉटेल क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. नुकेतच तिने स्वतःचे रेस्टॉरंट (Shreya Bugde Starts New Restaurant) सुरु केले आहे.

श्रेयाने मुंबईमध्ये दादर येथे स्वतःचे रेस्टॉरंट सुरु केले आहे. 26 जानेवारी रोजी तिने आपल्या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले आहे. या प्रसंगी अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. तिने आपल्या रेस्टॉरंटचे नाव ‘द फिश बिग कंपनी’ असे ठेवले आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना माशांचे वेगवेगळे प्रकार चाखायला मिळणार आहेत. श्रेयाने हॉटेल क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. श्रेयाच्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Bugde च्या रेस्टॉरंट चे फोटोज

Shreya Bugde Starts New Restaurant
Shreya Bugde Starts New Restaurant
Shreya Bugde Starts New Restaurant
Shreya Bugde Starts New Restaurant

श्रेयाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे कि तिने रेस्टॉरंटचा व्यवसाय का सुरु केला. तिने अनेक खुलासे करत म्हणाली कि, “दादर नेहमी गजबलेलं असतं. दादर मुमाबी 28 हा आपला पत्ता असला पाहिजे असं आमचं स्वप्न होतं. आमचं रेस्टॉरंट दादरच्या अगदी मध्यभागी आहे. आता मी रोज दोन तास इथे येऊन व्यवसाय सांभाळणार आहे.

श्रेयाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या अभिनयाच्या बळावर अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. तिची कॉमेडी क्वीन म्हणून विशेष ओळख आहे. नाटक, मालिका, चित्रपटा या माध्यमातून ती प्रेक्षकांचे करत असते. आता अभिनयासोबत ती व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील उतरली आहे.

हेही वाचा: रितेश-जेनेलियाच्या मुलांचं आजीबरोबर ‘असं’ आहे बॉण्डिंग! जेनेलियाने शेयर केले लातूरमधील न पाहिलेले फोटो