मुलीच्या वाढदिवसानिमित्त एम धोनीने घेतले देवरी येथील दुर्गा माताचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

MS Dhoni visits Dewri Temple: टीम इंडियाचा माजी कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. सोमवारी धोनीने येथील तमार स्थित प्रसिद्ध देवरी मंदिर मधील दुर्गा माताचे आशीर्वाद घेतले. (MS Dhoni visits Dewri Temple) धोनीची मुलगी जीवा मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी आपला सहावा वाढदिवस साजरा करत आहे. याआधी त्याने येथील मंदिरामध्ये दर्शन घेतले. देवरी मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

MS Dhoni visits Dewri Temple

एम धोनीचा व्हिडीओ व्हायरल – MS Dhoni visits Dewri Temple

धोनी येथे दुर्गा देवीच्या दर्शनानंतर नारळाचा प्रसाद आणि चुनरी घेऊन जाताना दिसला. मंदिरामध्ये धोनीला पाहून इथे आलेले भाविक चकित झाले आणि जे धोनीच्या जवळ होते ते त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. धोनी इथे नेहमी येत असतो. तो पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगचा 2024 चा सीजन चालू होण्यापूर्वी दुर्गा देवीचे आशीर्वाद (MS Dhoni visits Dewri Temple) घेण्यासाठी आला होता.

2023 मध्ये CSK ला पाचव्यांदा जिंकून दिला किताब

42 वर्षीय धोनी अजून देखील क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळत आहे आणि तो संधाचा कर्णधार देखील आहे. गेल्या वर्षी असा अंदाज लावला जात होता कि तो या लीग नंतर निवृत्ती घेईल, पण चेन्नई सुपर किंग्सला पाचवा किताब जिंकून दिल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली नाही आणि चाहत्यान पुढचा सीजन खेळण्याचे आश्वासन दिले.

सर्जरीनंतर पुनरागमन करणार धोनी

गुडघ्याच्या सर्जरीनंतर धोनीचे लक्ष आता चेन्नई सुपर किंग्सला आता सहावे विजेतेपद मिळवून देण्याचे लक्ष आहे. नवीन सीजन पूर्वी त्याने आपल्या मूळ गावातील देवीचे दर्शन घेतले. यानंतर तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये खेळण्याची तयार करणार आहे. यावेळी असा अंदाज लावला जात आहे कि तो या सीजननंतर नक्कीच निवृत्ती घोषित करेल. धोनी आता आयपीएलशिवाय कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सक्रिय नाही. पण आजही यष्टिरक्षण, कर्णधारपद आणि फलंदाजीमध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही.

हेही वाचा: मोहम्मद शमीने असा साजरा केला भाचीचा चौथा वाढदिवस, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल