Nava Gadi Nava Rajya: 23 डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका, कलाकारांनी असा साजरा केला शुटींगचा शेवटचा दिवस

Nava Gadi Nava Rajya: झी मराठी वरील अनेक जुन्या मालिका दर्शकांचा निरोप घेऊन नवीन रियालिटी शो आणि नव्या मालिका दर्शकांच्या भेटीला येत आहेत. लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिकांनंतर आता ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शुटींग पूर्ण झाले होते. यादरम्यान कलाकारांनी शुटींगचा शेवटचा दिवस आनंदात साजरा केला, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल (Nava Gadi Nava Rajya)

अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) मालिका 8 ऑगस्ट 2022 पासून झी मराठीवर प्रसारित झाली होती. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशा कलाकारांनी अल्पावधीमध्येच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण करण्यात यश मिळवले होते. मालिकेतील नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडले होते. त्यामुळे मालिका खूपच लोकप्रिय झाली होती.

Nava Gadi Nava Rajya

मालिकेची बदलण्यात आली होती वेळ

मध्यंतरी मालिकेची मूळ वेळ बदलण्यात आली होती पण तरीही मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या हि मालिका दुपारी 2 वाजता प्रसारित केली जाते. पण आता हि मालिका अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 10 डिसेंबर रोजी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शुटींग पूर्ण झाले होते. तर 23 डिसेंबर रोजी या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होणार आहे. यादरम्यान सर्व कलाकारांनी केक कापून आनंद साजरा केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मालिका बंद होत असल्यामुळे सध्या प्रेक्षकवर्ग खूपच नाराज आहे. अनेकांनी आपली नाराजी व्हिडीओवर कमेंट करून व्यक्त केली आहे. मालिकेच्या बाबतीत समारोप हा शब्द सुद्धा नको वाटतोय, मालिका बंद करू नका, हा शेवट पाहणं अवघड आहे, अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान नवा गडी नवं राज्य आणि ३६ गुणी जोडी या दोन मालिका बंद झाल्यानंतर झी मराठीवर दोन नव्या मालिका प्रसारित होणार आहेत. मनसोक्त हसणारी ‘पारू’ आणि बिनधास्त जगणारे ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी…एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ अशा दोन नव्या मालिका झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हेही वाचा:  ‘नवा गडी नवं राज्य’ सिरीयल बंद होत असल्यामुळे दर्शक नाराज, म्हणाले: ‘सिरीयल पुन्हा…’

Leave a Comment